वरळी हिट अँड रन प्रकरणी (Worli Hit And Run Case) वरळी पोलिसांनी (Worli Police) शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) आणि राजेंद्रसिंह बिदावत (Rajendra Singh Bidawat) यांना अटक केली आहे. राजेश शाह हे आरोपी मिहिर शाहचे वडील आहेत. मिहीर हा अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो अद्याप फरार आहे. अपघाताची घडना घडल्यानंतर वरळी पोलिसांनी राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना ताब्यत घेतलं होतं. अपघाताच्या वेळी राजेंद्र सिंह कारमध्ये होते. दरम्यान, दिवसभर या दोघांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर आज रात्री त्यांना अटक केली. या दोघांनी आरोपी मिहिर शाहला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच या अपघात प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
तर पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कलम 105, 281, 125, 1,281, 125 (बी), (बी), 238, 324 (4) आणि 184, 134 (अ), 134 (बी), 187 मोटार वाहन कायद्यानुसार मिहीरवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वरळी पोलिसांनी राजेश शहा यांच्यावर कारवाई करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलतांना त्यांनी सांगितलं की, या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या घटनेत जो कोणी आरोपी असेल, त्याला सरकार पाठीशी घालणार नाही. या सरकारमध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
पुढील काही तास मुंबईसाठी का धोक्याचे ?
Worli Hit And Run Case गरीबांच्या बाजूने कोण?
पत्नीच्या मृत्यूमुळे प्रदीप नाकवा यांना हुंदके अनावर. ते म्हणाले, पोलिसांनी सांगितले आहे की ते त्यांना कठोर शिक्षा देणार आहेत. पण माझी बायको परत येणार आहे का? बायको दोन मुलं सोडून गेली.. मोठ्या लोकांच्या बाजूने पूर्ण दुनिया आहे. पण, गरीबांच्या मागे कोण आहे? असा सवाल त्यांनी केला.
Worli Hit And Run Case नेमकी घटना काय?
वरळीत पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. या त्या महिलेचा मृत्यू झाला.