23.1 C
New York

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा जोर वाढला; अनेक ठिकाणी साचले पाणी

Published:

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील विविध भागात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दरम्यान, त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला आहे. (Mumbai Rain ) सध्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतकंच नव्हे तर कुर्ला स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस 30 मिनिटं उशिराने धावत आहेत.(Rain ) याचा मध्य रेल्वे आणि हार्बर लाइन यांना फटका बसला आहे.

Mumbai Rain आज दिवसभर पाऊस

संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे कल्याण-कसारा सेक्शनमध्ये खडवली आणि टिटवाळा दरम्यान लोकल ट्रेनची वाहतूक काल विस्कळीत झाली होती. ही स्थित आजही तशीच आहे. दरम्यान या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार असून. शहरात रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागानुसार, आज दिवसभर मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस राहील, रात्री मेघगर्जनेसह वादळाची शक्यता आहे.

वीज कर्मचाऱ्यांना इतके टक्के वेतन वाढ, फडणवीसांची मोठी घोषणा

Mumbai Rain वाहतूक विस्कळीत

संपूर्ण मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असून, मुंबईच्या विविध भागात पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर देखील पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे, शिवाय रेल्वे सेवेवर देखील या पावसाचा परिणाम झाला आहे.

Mumbai Rain एक्स्प्रेस गाड्या रद्द

भांडुप रेल्वे हे पाण्याखाली गेले असून सी एस एमटी वरून ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली, तर लांब पल्ल्याच्या मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ठाणे आणि दिवा स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या सायन परिसरातील गांधी मार्केट मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे. याबरोबर पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img