किल्ले रायगडावर (Raigad Fort) काल मध्यरात्री ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होतं. बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचं पाणी वाहिलं. किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात ही भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. या दरम्यान अनेक पर्यटक तारेवरची कसरत करत वहात्या पाण्यात आडकून पडले.
सध्या राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला झालाय. आज रायगडात मुसळधार पाऊस कोसळला आहे. ढगफुटी झाल्यामुळे काही भागात अनेक नद्या तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रुप पाहायला मिळतंय, यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले आहेत. किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप आलं आहे, त्यामुळे यावरुन खाली उतरणं देखील कठीण झालं आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील तीन-चार तास मुसळधार पाऊस
Raigad Fort वाहून गेलेल्या व्यक्तीचा तपास सुरु
आज (दि.८) सध्याची असलेली स्थिती लक्षात घेता रायगड रोपवे प्रशासन मार्फत रोपवे व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये किल्ले रायगड परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. रायगड वाडी येथील वाहून गेलेल्या इसमाच्या तपासाकरता स्थानिक आपदा मित्र व पोलिस यंत्रणेमार्फत सकाळपासून सुरू आहे. आल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
पावसाचा जोर कमी होताच या पर्यटकांनी किल्ल्यावरून धूम ठोकली. या पावसाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर आहे. एकंदरीत पावसाचं वातावरण पाहता आज जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
Raigad Fort रत्नागिरीत नद्यांची पाणीपातळी वाढली
रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं पुरतं झोडपून काढलं आहे. सोशल मीडियावर मुसळधार पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढल्याचं दिसत आहे. राजापूर तालुक्यातील पूर्व भागांत आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या काही गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर या भागातील नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे. खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडली असून नदीकिनारीच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.