3.1 C
New York

Eknath Shinde : मुंबईसह कोकणात ऑरेंज अर्लट; मुख्यमंत्री म्हणाले

Published:

मुंबईची तुंबई काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे झाली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पावसाबद्दल झालेल्या उपाययोजनांबद्दलची सविस्तर माहिती दिली.

Eknath Shinde मुंबईत अतिवृष्टीसारखीच परिस्थिती

“मुंबईत २६७ ते ३०० मिमी इतका पाऊस झाला आहे. मुंबईत अतिवृष्टीसारखीच परिस्थिती जर ६५ मिमीच्या वर पाऊस झाला तर निर्माण होते. त्यात मुंबईत ३०० मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही रेल्वेच्या रुळांवर पाणी आलं. चुनाभट्टी सायन या ठिकाणीही पाणी साचलं. यामुळे रेल्वे सेवाही ठप्प झाली. परंतु रेल्वे, पालिका आणि राज्य सरकार या सर्वांनी मिळून काम केले आहे”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू

“रेल्वेचे २०० पंप सुरु आहे. मुंबई महापालिकेचे ४८१ पंप सुरु आहेत. हे पंप पाण्याचा निचरा करण्याचे काम करत आहेत. हिंदमाता, गांधी मार्केट, मिलन सबवे या ठिकाणी पाणी साचलं नाही. कारण याठिकाणी असलेल्या पंपाने तातडीने काम केले. होल्डिंग पाँडचाही मोठा फायदा झाला आहे. तसेच रेल्वेच्या खाली मायक्रो टनलिंग केलेल्याचाही खूप मोठा फायदा होत आहे. देशात पहिल्यांदाच होल्डिंग पाँड आणि मायक्रो टनलिंगसारखी सुविधा मुंबईत उपलब्ध आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट

“मी सकाळपासूनच सर्व यंत्रणांच्या संपर्कात होतो. ट्रेन्स यात कोणत्या थांबलेल्या आहेत, याबद्द्लचीही माहिती घेत होतो. मध्य रेल्वे सुरु झाली आहे. तसेच हार्बर रेल्वेही सुरु आहे. आता पाण्याचा निचरा झाल्याने रेल्वे सेवाही सुरळीत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बीएसटी आणि एसटीलाही सूचना केल्या होत्या. ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी सेवा द्या, अशी सूचना केली होती. सध्या कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, जळगाव या ठिकाणीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील ज्या रस्त्यांवर सकाळी पाणी साचले होते, त्या रस्त्यांवरी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. रेल्वेही सुरु झाली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती, पण ती देखील पू्र्ववत करण्यात आली आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे आता मोगरा पंपिंग स्टेशन, माहुल पंपिंग स्टेशन करत आहोत. तसेच मिठी नदी आणि पोयसर नदी या दोन नद्यांची कॅरिंग कॅपिसिटी वाढवत आहोत. तसेच मिठी नदीला पंप गेट आणि फ्लड गेटं बसवले जाणार आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी पुन्हा शहरात येणार नाही. त्या उलट मुंबईत हायटाईड असताना साचलेले पाणी बाहेर टाकले जाईल”, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img