23.1 C
New York

Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू

Published:

मुंबई

कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेले पाणी (Mumbai Rain) ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची (Local Train) वाहतूक सुरू झाली आहे. तर चुनाभट्टी येथील पाणी कमी झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक देखील सुरू झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते कर्जत आणि कसारा वाहतूक सुरू झाली. तर पनवेल ते सीएसएमटी ही वाहतूक देखील सुरू झाली आहे. तसंच, पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील सुरू झाली असून ती उशिराने सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कसारासाठी विशेष लोकल सुरू झाली आहे. सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडुप स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक वर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प होती. मध्य रेल्वेच्या काही स्टेशनवर एकामागे एक अशा रेल्वे ट्रेन एक्सप्रेस गाडी उभ्या रांगेत होत्या. विशेष लोकल सुरू करत खोळंबलेलं रेल्वे वेळापत्रक पुन्हा सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न सुरु कररण्यात येत आहे. तर विशेष लोकल सोडत असल्याचीमाहिती मिळताच पुन्हा स्टेशन परिसरात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र दुपार नंतर मध्यरेल्वे ची सेवा पूर्वपदावर आली असून, बदलापूर रेल्वे स्थानकातून दुपारी 1 वाजून 22 मिनिटांची पहिली थेट लोकल मुंबईकडे रवाना करण्यात आली. मात्र या सगळ्या त्रासात सकाळपासून रेल्वे स्थानकात ताटकळत बसलेल्या अनेक चाकरमान्यांना पुन्हा घरी माघारी फिरावे लागले.

कालपासून मुंबईसह राज्यात पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील २,३ दिवस कोकणातील घाट भागात ऑरेंज अलर्ट राहील, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. मुंबईकरांना महत्वाचं आवाहन… गरज नसेल तर आज घराबाहेर जाणं टाळा… धो- धो पाऊस कोसळतोय. त्यातच मुंबईत आज मोठी भरती येणार आहे. 1. 57 मिनिटांनी मोठी भरती मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर आदळणार आहे. त्यामुळे बीचवर जाणं टाळा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img