26.6 C
New York

Heavy Rain : मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर

Published:

मुंबई (Mumbai) आणि कोकणात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. पाणी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात साचलं आहे. तसेच कोकणातील विविध गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील तीन ते चार तास हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर (Schools Announced holiday) करण्यात आली आहे.

Heavy Rain पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा…

दरम्यान, गेल्या सहा तासांमध्ये मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर आता पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. तसंच पुढील 24 तासांत शहरातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. रात्रभरात झालेला पाऊस आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईकरांनी शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळणंच आवश्यक आहे. त्यामुळे शाळकरी मुलं पावसात कुठे अडकू नये. यासाठी मुंबई आणि कोकणात शाळांकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Heavy Rain मुख्यमंत्र्यांचं आवाहन अन् महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी…

दरम्यान मुंबईतील पावसाची स्थितीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण रेल्वेच्या डीआरएमसोबत चर्चा केली असून महानगरपालिका आयुक्त आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. असं सांगितलं. तर महानगरपालिकेकडून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदतीसाठी 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा. असं आवाहन करण्यात आलं आहे.

पुढील काही तास मुंबईसाठी का धोक्याचे ?

Heavy Rain अंगावरून रेल्वेचा डबा गेल्याने महिलेचे पाय निकामी…

पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून गुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामूळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र काही वेळात रेल्वे मागे रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.

कुर्ला, चुनाभट्टी परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. त्यामुळे हार्बरवर अनेक परेल्वे उशिराने धावत होत्या. तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. यातच अनेक तासापासून बेलापूर वरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती. गर्दीत महीलेचा पाय घसरून रेल्वे रुळावर पडली आणि तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला.

Heavy Rain मुंबईतील कोणत्या भागात किती पाऊस?

वीर सावरकर मार्ग 315.6 मिमी.
MCMCR पवई 314.6 मिमी.
मालपा डोंगरी 292.2 मिमी.
चकाला 278.2 मिमी.
आरे वसाहत 259 मिमी.
नारीयलवाडी 241.6 मिमी.
कलेक्टर कॉलनी 221.2 मिमी.
प्रतिक्षा नगर 220.2 मिमी.
नूतन विद्यामंदिर 190.6 मिमी.
लालबहादूर शास्त्री मार्ग 189 मिमी.
शिवडी कोळीवाडा 185.8 मिमी.
रावळी कॅम्प 176.3 मिमी.
धारावी 165.8 मिमी.
पवई – 320 मिमी.
अंधेरी – 298 मिमी.
चेंबूर – 222 मिमी.
गोरेगाव – 279 मिमी.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img