23.1 C
New York

Heavy Rain : मुंबईत जोरदार पाऊस, लोकांनी घराबाहेर पडू नये – अजित पवार

Published:

मुंबई

मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. रात्रीपासूनच मुंबईत जोरदार (Heavy Rain) पाऊस झाला. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसाचा केवळ सामान्यांनाच नव्हे तर रेल्वे आणि एसटी, बसेस सेवांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आहे. रात्रभरात तब्बल 300 मिलिमीटर पाऊस कोसळल्याने ही दाणादाण उडाल्याचं समोर आलं आहे. आवश्यक असल्यास नागरिकांनी दराबाहेर पडावे अन्यथा पडू नये असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागरिकांना केले आहे.

अजित पवार म्हणाले की, काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या 10 टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पावसामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला  १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव  या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०८.०७.२०२४) पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.  ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते.  गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे,  अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.    

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img