23.1 C
New York

Heavy Rain : आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सला मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ निर्देश

Published:

मुंबई

मुंबईसह ठाणे, पालघर व आजूबाजूच्या मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले आहे. यामुळे आज सोमवारी सकाळीपासूनच नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली आहे. मुंबईची लाईफ लाईन असलेले लोकल सेवेला देखील फटका बसला आहे. मध्य रेल्वे, आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली असून याचा फटका अनेकांना बसला आहे. पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममधून परिस्थितीचा आढावा घेतला. विक्रमी पावसामुळे पाणी साचलं होतं, पण आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. असे प्रसार माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हटले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, काल रात्रीपासून मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये जो काही पाऊस पडतोय, याचा फटका बसला आहे. मुंबईमध्ये 267 ते 300 एमएम पाऊस पडला आहे. 65 एमएमच्या वर गेल्यानंतर अतिवृष्टी सारखाच परिस्थिती निर्माण होते. परंतु आज 267 पेक्षा जास्त म्हणजे 300 एमएमपर्यंत पाऊस पडलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. चुनाभट्टी आणि सायन या भागामध्ये देखील पाणी साचलं आहे. त्यामुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाला असून रेल्वे, बीएमसी आणि राज्य आपत्ती विभागाकडून ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, तिथे 200 पंप सुरू आहेत. याशिवाय बीएमसीचे 441 पंप सुरू आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचलं आहे, तिथून तत्काळ पाणी निचरा करण्याच काम सुरू आहे.

नालेसफाईवरून आज राजकारण करण्याची वेळ नाही, तर आज लोकांना मदत करण गरजेच आहे. याशिवाय मी सकाळपासूनच रेल्वे, बीएमसी आणि राज्य आपत्ती विभागाच्या मुख्य सचिवांच्या संपर्कात आहे. रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मी एनडीआरएफ प्रमुखांसह आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या दलांशीही सकाळी चर्चा केली आहे. त्यांना अलर्ट राहण्याची सूचना करण्यात आली आहे. कुठे काही झाले आणि त्यांची मदत लागली, तर आपल्याला ती घेता येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबईत काल रात्रीपासून 267 ते 300 मीमी पाऊस पडला आहे. मुंबईत पाऊस 65 मीमी च्या वर झाला की पूरसदृश्य परिस्थिती तयार होते. पण पालिकेनं सकाळपासून चांगलं काम केलं आहे. 441 पंप मुंबईभरात सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हिंदमाता परिसरात तितकं पाणी साचलेलं नाही. तिन्ही रेल्वेमार्ग आता सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img