10 C
New York

Dombivli : पाणीटंचाईच्या विरोधात रहिवाशांचं बिल्डरच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

आम्ही घरे तुमच्या कडून घेतली, आम्हाला योग्य दाबाने पाणी पुरवठा करणे विकासकाचे काम आहे असा पवित्रा घेत रविवार 7 तारखेला डोंबिवलीजवळील (Dombivli) अनंतम गृहसंकुलातील रहिवाशांनी ठिय्या आंदोलन केले. एमआयडीसी कडूनच काही दिवस काही दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे विकासाने सांगितले.

डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी अंतनम गृह संकुलात देखील पाणीटंचाईने रहिवासी हैराण झाले आहेत. रविवारी सकाळी येथील राहिवाशांनी थेट विकासाचे कार्यालय गाठले. संतप्त रहिवाशांनी विकासकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. येथील राहिवाशी शरद पाटील म्हणाले, पाणी समस्या का सुटत नाही याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण विकासकाच्या कार्यालयात गेलो असता येथील बाउंसरने अडवले.यावेळी आमचा आणि बाऊन्सर मध्ये वाद झाला. काहीवेळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी देखील पाणीटंचाईमुळे इथल्या रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आता पुन्हा पाणीटंचाई निर्माण होत असल्याने रहिवाशी संतापले आहेत.योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याविषयी विकासकाने लेखी आश्वासन द्यावे अशी आग्रही भूमिका रहिवाशांकडून घेण्यात आली. आम्ही घर घेताना विकासाकडून अनेक आश्वासन देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात तसं काही होत नसून स पाणीपुरवठा ही आम्हाला नीट होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. काही वेळानंतर विकासक आणि रहिवासी यांच्यामध्ये चर्चा झाली. एमआयडीसीकार्यालयाकडे बोट दाखविले. मात्र एमआयडीसी कडे नाही तर बिल्डरांकडे बघून घर घेतली असून आम्हाला पाणी तुम्हीच पूरविले पाहिजे अशी मागणी केली. यावर लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा राहिवाशांनी दिला.

याबाबत रीजन्सी अनंतनचे विकासक संतोष डावखरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले,रीजन्सी अनंता प्रोजेक्ट हॅन्ड ओव्हर करून अडीच ते तीन वर्षे झालेली आहे. लोकांच्या रिक्वायरमेंट पेक्षा आम्ही जास्त पाणीपुरवठा एमआयडीसी कडून मंजूर करून ठेवलेला आहे. एमआयडीसी कडून सुरळीत पाणीपुरवठा सुरू होता. मात्र गेल्या एक दीड महिन्यापासून सर्विसिंगच्या कारणामुळे व इतर कारणामुळे एमआयडीसीकडे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. पाणीपुरवठा लवकर सुरू होईल असा आश्वासन सुद्धा अधिकारी देत आहेत. जेवढा पाणीपुरवठा आम्ही मंजूर केला होता त्यापैकी 25 ते 30 टक्केच पाणीपुरवठा ते देऊ शकत आहे.. नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत असल्यामुळे नागरिक आमच्याकडे आले होते.शनिवार व रविवार एमआयडीसीचे कार्यालय बंद असतात. त्यामुळे नागरिक आले. इथे राहणारे नागरिक आमचे आहे. त्यांना कोणताही त्रास नाही…पाण्याचा झालेला त्रास तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमीच पाठपुरावा करत असून आमचे प्रयत्न सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img