Bigg Boss OTT 3: पहिल्यादिवसापासून ‘बिग बॉस ओटीटी’चा(Bigg Boss OTT 3) नवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. शोच्या तिसऱ्या आठवड्यात घरातला आणखी एक सदस्य बाहेर गेला आहे. नुकतंच मुनीषा खटवानीचा या शोमधील प्रवास संपला आहे. यंदाच्या बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात युट्युबर अरमान मलिक (Arman Malik) त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका यांना घेऊन सहभागी झाला होता. ‘बिग बॉस’च्या घरात अरमान आणि त्याच्या दोन पत्नींना पाहून चाहतेदेखील चकित झाले होते. शोच्या पहिल्याच विकेंडमध्ये अरमानची पहिली पत्नी पायल हिला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडाव लागल. पण त्यानंतर मात्र घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Bigg Boss OTT 3: जस जसे दिवस पुढे जात आहेत, तसंच बिगबॉसच्या घरातील सदस्यांचे वेगवेगळे रंग दिसू लागले आहेत. बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने नुकतंच ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये प्रवेश केला होता. विशाल पांडेच सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी ती घरात आलेली. विशाल पांडेने लवकेश कटारियाला कृतिका मलिक (Krutika Malik) आवडल्याचं सांगितलं होत. ‘विकेंडच्या वार’मध्ये अनिल कपूरसमोर (Anil Kapoor) पायलने विशालला सर्व सत्य सांगण्यास सांगितलं होत. ‘भाभी अच्छी लगती हैं’ याचा अर्थ वेगळा होता, असं विशाल वारंवार स्पष्ट करत होता. माझा बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. यावर अनिल कपूर संतापून म्हंटले की, तुझा हेतू चुकीचा नव्हता तर लवकेशच्या कानात हे वक्तव्य का केलंस ? याच्यावर विशालकडे उत्तर नव्हतं.
एमएस धोनीच्या वाढदिवसाला सलमान खानने लावली हजेरी; पाहा व्हिडिओ
Bigg Boss OTT 3: विकेंडच्या वारानंतर घरातलं संपूर्ण वातावरण तापल्याच दिसलं. अरमानच्या दुसऱ्या पत्नीबद्धल विशाल पांडेने केलेलं वक्तव्य ऐकून अरमान संतापला असून त्याने सरळ विशालच्या कानशिलात लगावून दिली आहे. सोशल मीडियावर जिओ सिनेमाच्या माध्मयातून हा विडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अरमान विशालला विचारतो की, “तूझी पहिल्यापासूनच अशी वाईट सवय आहे कि तुला आता लागली आहे ही सवय ?”.
त्यावर विशाल त्याला म्हणाला,”मी त्या उद्देशाने नाही म्हणालो, माझा बोलण्याचा तो उद्धेश नव्हता”. विशालने दिलेलं हे उत्तर ऐकून अरमान लवकेश कटारियाकडे पाहून म्हणाला, “तू तर त्याला काहीच बोलत नाहीयेस… आज माझ्या पत्नीसाठी असं बोलला आहे. उद्या तुझ्याबाबतीतसुद्धा असं होईल,” त्यानंतर विशालने कटारियाला विचारलं की मी तुला नक्की काय म्हणालो होतो, ते फक्त सांग. यावर लवकेश कटारिया म्हणाला, “तू मला असं म्हणालास की मुझे भाभी अच्छी लगती है”. आणि कृतिका मलिक बद्धल हे ऐकताच अरमानचा पारा एकदमच चढतो आणि तो खूप भडकतो. त्यानंतर अरमानचा पारा सुटतो आणि सरळ विशाल पांडेच्या कानाखाली वाजवतो. अरमानने या केलेल्या कृत्यावरून विशाल पांडेसुद्धा भडकल्याचं पाहायला मिळालंय. यादरम्यानचा विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.