22.3 C
New York

Alanna Pandey: अनन्या पांडे झाली मावशी! चंकी पांडेच्या घरात छोट्या पुत्राच आगमन

Published:

Alanna Pandey: बॉलीवूडचा अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) च्या घरी चिमुकल्याच आगमन झालेलं आहे. चंकी पांडे हा आजोबा झालेला आहे. अनन्याच्या चुलत बहिणीला पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. अलाना पांडेने गेल्या वर्षी आयव्हर मॅक्रेसोबत लग्नगाठ बांधली होती. अलाना (Alanna Pandey) आणि आयव्हर (Ivor McCray) यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून गुड न्यूज दिली. अलाना आणि आयव्हरने आता त्यांच्या मुलाचे स्वागत केले आहे. सोमवारी सकाळी या जोडप्याने एक व्हिडिओ शेअर करत मुलगा झाला असल्याचं म्हंटल आहे. या व्हिडिओमध्ये अलाना आयव्हर आणि त्यांचं चिमुकलं बाळही दिसत आहे. दोघांनी आमचं एंजल इथे आहे… असं व्हिडिओला कॅप्शन दिलंय. तर, अनन्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं माझा सुंदर भाचा इथे आहे.

Alanna Pandey: अलाना आणि आयव्हर यांनी गर्भलिंगनिदान याची चाचणी केली होती. बेबी शॉवरला त्यांची सर्व थीम ब्लु रंगाची ठेवली होती. या बेबी शोअरला अनन्याचा कथित बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसह बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते. परदेशामध्ये काही नियमांच्या अधीन राहून ही गर्भलिंगनिदान चाचणी केली जाते.

‘मुझे भाभी अच्छी लगती है’, विशाल पांडेच्या लगावली कानशिलात!

Alanna Pandey: दरम्यान, अलानाच्या बेबी शॉवरला गौरी खान, बिपाशा बसू, करण सिंग ग्रोवर, शनाया कपूर, महीप कपूर यांसारखे अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळाले होते. अलाना सोशल मीडिया इनल्फ्लूएन्सर आहे. गेल्या वर्षी तिने शाहरुख खान आणि अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं होते. आता चिमुकल्याच्या जन्मानंतर चाहते तीच भरभरून अभिनंदन करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img