23.1 C
New York

Maratha Reservation : सगेसोयऱ्या अध्यादेशाबाबत चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य

Published:

पंढरपुर

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) वाद पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी आरक्षणातून (OBC reservation) मराठ्यांना आरक्षण देण्याची आणि सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली. तर जरांगेच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला. अशातच आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सगेसोरऱ्याच्या अंमलबजावणीबाबत खात्रीशीर विधान केलं.

चंद्रकांत पाटील यांनी आज पंढरपुरमध्ये असतांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकार लवकरच सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार आहे. मात्र, यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता अधिसूचना काढली जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

एकीकडे राज्यातील ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे, तर दुसरीकडे मराठा समाज ओबीसींमधून आरक्षण मागत आहे. शिवाय, सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरागेंची आहे. कुणबी मराठा, सगेसोयर आणि हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसींतूनच आरक्षण द्यावे, त्यासाठीच आमचा लढा असल्याचं जरांगे सांगत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img