सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांचा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळा साजेसा नसल्याने तो बदलण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विधानसभेत केली. त्यावर, हा पुतळा बदलण्याची सरकारची तयारी आहे, (Ajit Pawar) असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
शाहू महाराजांच्या दिल्लीतील या पुतळ्याबाबत अनेक तक्रारी आहेत. अनेक शाहूप्रेमींनी त्याबाबत आक्षेप घेतले आहेत. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचं एकूणच प्रतिबिंब या पुतळ्यात उमटत नाही. हा पुतळा कृश आहे, डोळे आत गेलेले आहेत, या आधी जो पुतळा बसविलेला होता, तो बदलण्याची गरज नव्हती, पुन्हा तोच पुतळा बसवावा. महाराजांचा जसा पुतळा कोल्हापूरच्या दसरा चौकात आहे तसाच बसविण्यात यावा अशी मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे
वडेट्टीवारांच्या या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, शाहू महाराजांचे वंशज असलेले छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खासदार म्हणून दिल्लीत गेलेले आहेत. ते महाराजांचे वारसदारच आहेत. तेव्हा त्यांच्याशी मी या पुतळ्यासंदर्भात चर्चा करेन. गरज भासल्यास त्यांना मी दिल्लीत जाऊनही भेटेन. पुतळा बदलण्याची सरकारची तयारी आहे. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसाच पुतळा असायला हवा, ही सरकारची भूमिका आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले.