26.6 C
New York

Safety Alert: जुन्नर तालुक्यात पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश 

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.७ जूलै ( रमेश तांबे )

दि.३० जून रोजी भूशी डॅम, लोणावळा येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपाययोजना करणेबाबत (Safety Alert) निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यसचिव यांनी देखील दि.१ जुलै रोजी सूचना दिलेल्या असून  जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे व उपविभागीय अधिकारी,जुन्नर आंबेगांव, उपविभाग मंचर यांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी परिपत्रकाव्दारे सूचना निर्गमित केलेल्या आहेत. 

पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत पाव अशी माहिती जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. या प्रकरणी मा.जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांनी दिनांक २ जूलै अन्वये जुत्रर, खेड, आंबेगाव तालुक्यातील प्रामुख्याच्या ठिकाणी पावसाळयातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता दिनांक २ जूलै ते दिनांक ३१ जूलै पर्यंत खालील ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले असून त्याची अंमलबजावणी करणेकामी खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत येत आहे. सदर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतच्या कार्यवाहीची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याची

दक्षता सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घ्यावी. सदर उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवरती भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व तत्सम कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात यावी. जुन्नर वनविभागातील निसर्गपर्यटन स्थळे.वनपरिक्षेत्र जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळे गडकिल्ले परिसर किल्ले शिवनेरी, चावंड, जिवधन, हडसर, निर्मागरी इ. धबधबा परिसर आंबोली धबधबा (दाऱ्याघाट), कांचन धबधबा (हातवीज) व रिवर्स वॉटरफॉल (नाणेघाट). जुन्नर आडराई जंगल ट्रेक, काळू धबधबा, पिनाकी धबधबा ( कोपरे ), घारीचा धबधबा ( कोपरे ), धूरनळी धबधबा (ओतूर ). किल्ले जिवधन, चावंड, हडसर, निर्मागरी इ. येथे जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.नाणेघाट येथे “नाणेघाट अंगठया” वर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी कार्यवाही
किल्ले, धबधबे येथील प्रत्येक कडाभागापासून २० मी.अंतराचे आवारात जाणेस मनाई करण्यात येत आहे.
उपरोक्त सर्व पर्यटनस्थळावर जाताना मार्गदर्शक ( गाईड ) सोबत घेऊन जाणे अनिवार्य राहिल.पर्यटनक्षेत्र परिसरात लावलेल्या सर्व सूचनाफलकांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहिल.जेथे सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंग उभारण्यात आलेल्या आहे, त्यापलीकडे जाणेस मनाई आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहिल. 9. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहण्यास मनाई. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास मनाई.पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचेकठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.
पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे इत्यादीवर बंदी घालण्यात येत आहे.
वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहणे थांबविणेस मनाई.वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणेस बंदी. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, धर्मकॉलचे व प्लास्टिकचे
साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यास प्रतिबंध करण्यात आहे. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन कृती करण्यावर प्रतिबंध घालण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे, त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे तसेच ज्याकृतीमुळे ध्वनी, वायु व जलप्रदुषण होईल अशी कोणतही कृती करण्यावर बंदी घालण्यात येत आहे. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करणेस मनाई करणेत येत आहे. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img