डोंबिवली ( शंकर जाधव )
27 गावातील गावकऱ्यांनी गरजेपुरती बांधलेली बांधकामे सरसकट दस्त नोंदणी करणे, डोंबिवली (Dombivli) एमआयडीसीच्या झालेल्या स्फ़ोटात आगीमध्ये होरळलेल्या नागरिकांना नुकसानीची भरपाई ताबडतोब देणे,कल्याण तळोजा मेट्रो 12 च्या प्रकल्पात स्थानिकांना न्याय देणे अशा मागण्यांसाठी सर्व पक्षीय युवा संघटनेतर्फे बेमुदत साखळी उपोषण केले होते.मात्र शुक्रवार 5 तारखेला सायंकाळी सहा नंतर पालिका प्रशासन आणि पोलिसांनी उपोषणकर्त्यांच्या मंडपावर कारवाई करत नोटीसा पाठविल्या आहेत. मात्र आम्ही मागे हटणार नाही, आमच्या मागण्यासाठी आवाज उठ्विणारच,सरकारने जर आमच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आषाढी एकादशीनंतर भूमिपुत्र टाळ-मृदुंग हाती घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा संतोष केणे यांनी शनिवार 6 तारखेला पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकार परिषदेत सर्व पक्षीय युवा मोर्चा अध्यक्ष गजानन पाटील, माजी नगरसेवक संतोष केणे, मुकेश पाटील, रतन चांगो पाटील, काळू कोमास्कर, बाळाराम ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने भूमिपुत्र उपस्थित होते. यावेळी गजानन पाटील म्हणाले,२७ गावांची वेगळी नगरपालिका झाली पाहिजे या मुख्य मागणीसाठी सर्व पक्षीय युवा मोर्चा अध्यक्ष गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी पालिका प्रशासनाची परवानगी घेतली नाही म्हणून त्यावर कारवाई करीत तेथील मंडप पालिका प्रशासनाने उखडून टाकला. पोलिसांकडून दडपशाही सुरू आहे, आमचे आंदोलन चिरडून टाकू नका, भूमीपुत्रांच्या सन्मानाला जागे करू नका परिणाम वाईट होईल, पूर्वी आम्हाला ब्रिटिश संबोधले जायचे, त्यापद्धतीची कृती करण्यास भाग पाडू नका असा इशारा बेमुदत उपोषण थांबविलेल्या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
27 गावांमधील अति महत्त्वाचे प्रलंबित विषय मार्गी लागले जावेत तसेच राज्य शासनाचे लक्ष याकडे केंद्रीत व्हावे यासाठी डोंबिवली पूर्वेकडील मौजे सोनारपाडाजवळील साईबाबा मंदिरजवळ भूमिपुत्र बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले होते. मात्र शुक्रवारी पालिकेने मंडपावर कारवाई केली. आमचे आंदोलन थांबणार नाही तर ते अधिक मोठे असेल याची माहिती दिली.
रविवारी लोकलने प्रवास करण्याआधी वेळापत्रक नक्की पाहा
27 गावाची स्वतंत्र नगरपालिका आणि अमुदान केमिकल कंपनीतील स्फोटातील मुत्युमुखींच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये, मेट्रो संदर्भात कारशेड माणगाव आणि सोनारपाडा होतेय त्यावरील पोलिसांनी व एमएमआरडीएने भर पावसात जेसीबी लाऊन घरे तोडली. जनतेचे सरकार म्हणणाऱ्या या लोकांनी माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आणि दुसरीकडे या कारवाईत ४० दिवसाची मुलगी हातात घेतलेल्या आईला बेघर केले. हि अत्यंत वाईट गोष्ट आहे. तहसीलदारांन विनंती करूनही त्यांनी कारवाई केली. वास्तविक भूमिपुत्रांना विश्वासात न घेता व पूर्व सूचना न देता भूसंपादन केले. स्वतंत्रकाळापासून शेतकऱ्यांकडे या जमिनी आहेत,त्यावर त्यांचा अधिकार असून ताबा त्यांचा आहे.कारवाई करताना सरकारने शेतकऱ्यांचे हित पहिले नाही. आम्ही यावर आवाज उठविल्यावर विधानसभेत कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी आवाज उठविला. आमच्या मागण्या साठी उपोषण केले. मात्र त्यावर कारवाई झाली.जेल भरो आंदोलन करू. -संतोष केणे
अनेक मागण्यासाठी २७ गाव सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथील साईबाबा मंदिराजवळ बेमुदत साखळी उपोषण सुरु केले होते. पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन आमच्या मागण्या समीर ठेवू. विनंती करूनही जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर विराट मोर्चा काढू. – गजानन पाटील