23.1 C
New York

Deepika Padukone: मम्मा पादुकोणचा साडीत देसी स्वॅग! चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंसी ग्लो

Published:

Deepika Padukone: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाची तारीख जवळ येताच अनेक कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झालेली आहे. काल अनंत-राधिकाच्या संगीत सोहला दिमाखात पार पडला ज्यामध्ये बरेच बॉलीवूड्चे सितारे पाहायला मिळाले. या सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मॉम टू बी दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) तिने नेसलेल्या साडीत बेबी बम्प फ्लॉन्ट केला. दीपिका नेसलेल्या साडीत अप्रतिम दिसत असून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सीचा ग्लो पाहायला मिळतोय.

Deepika Padukone: मुंबईमध्ये NMACC येथे आयोजित केलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जांभळ्या रंगाची साडी परिधान करून मम्मा पादुकोणच्या सुंदर लूकने सर्वानाच थक्क केले. दीपिकाच्या बेबी बंपने तिचा लूक आणखी आकर्षित बनवला. आज दीपिकाने जांभळ्या रंगाची साडी नेसली आणि त्यावर सफेद व गोल्डन रंगाची ज्वेलरी परिधान केली होती. केसांचा सिम्पल असा स्लिक बन बांधून तिने लूकला पूर्ण केलं आहे.

मम्मा पादुकोणच्या पोस्ट वर पप्पा रणवीर ची कमेंट
Deepika Padukone: अंबानींच्या या सोहळ्याला दीपिकाने जांभळ्या रंगाच्या साडी नेसलेली ती तिच्यावर अगदी सुंदर दिसत होती. यादरम्यान ती तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. दीपिकाने तिच्या या साडीवरचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केले आहेत. या पोस्टला तिने नवरा रणवीरसाठी एक छोटं कॅप्शन लिहून त्याला टॅग केलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय, आज शुक्रवारची रात्र आहे… त्यामुळे बाळाला पार्टी करायचा मूड आहे @रणवीर सिंग असं लिहिलंय. त्यावर कमेंट करत रणवीरने, अरे वा… माझ्या वाढदिवसाची खास भेट, I Love You… अशी लक्ष वेधीत कमेंट केली आहे.

रणवीर आज करतोय ३९वा वाढदिवस साजरा
रणवीर सिंग आज ६ जुलै त्याचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाने पोस्ट केलेल्या या पोस्टला आतापर्यंत १० लाखापेक्षा अधिक लोकांनी लाईक आणि ८ हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

‘ओम शांती ओम’, अंबानी कुटुंब थिरकलं शाह रुख खानच्या गाण्यावर!

दीपिकाच्या बाळाची एन्ट्री या महिन्यात होणार
काही दिवसांपूर्वी २७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दीपिका पादुकोण दिसली होती. तिने या मार्चमध्ये ती प्रेग्नन्ट असल्याचं जाहीर केलेलं. येणाऱ्या सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार असल्याचं तिने सांगितलं आहे. दीपिकाच्या बाळाच्या एन्ट्रीची चाहत्यांना उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img