-2.6 C
New York

Hathras stampede : हाथरस सत्संग प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Published:

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात घडलेल्या दुर्घटनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. येथे सत्संग आयोजित करणारा मुख्य आरोपी देव प्रकाश मधूकर याला अटक करण्यात आली आहे. (Satsang) गेल्या पाच-सहा दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. (Hathras stampede) हाथरसमधील दुर्दैवी अपघातासाठी तो कारणीभूत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या अपघातात तब्बल १२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, जखमी १५० हून अधिक लोक झाले आहेत. यामध्ये महिलांचा जास्त समावेश आहे.

Hathras stampede परवानगीपेक्षा तिप्पट गर्दी

हाथरस येथे सत्संग भरवण्यात आला होता. हा सत्संग नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा याचा होता. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून ८० हजार लोकांची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात २.५ लाखांपेक्षा जास्त लोक येथे आल्याचं तपासात उघड झालं आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षारक्षकांनी बळाचा वापर केला. यामुळे चेंगराचेंगरी सुरू झाली. अनेक लोक चिरडले गेले. महिला आणि लहान मुलांचा यात समावेश आहे.

वडेट्टीवारांचा प्रश्न अन् अजित पवारांची सहमती. काय आहे प्रकरण

Hathras stampede धूळ डोक्याला लावण्यासाठी पळाले

भोले बाबा नामक व्यक्तीला ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. प्रशासनाने परवानगी दिल्यापेक्षा ही संख्या खूप जास्त होती. त्यामुळे पोलिसांची सख्याही कमी पडली. बाबाचा सत्संग कार्यक्रम झाल्यानंतर तो गाडीत बसून निघाला होता. यावेळी त्याच्या पायाची धूळ डोक्याला लावण्यासाठी लोकांनी गाडीमागे धाव घेतल्याचंही सांगितलं जातय. यावेळी उपस्थित रक्षकांनी त्यांना काठीने आवरण्याचा प्रयत्न केला आणि हा अपघात झाला. यात १२१ मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Hathras stampede दोषींवर कारवाई होईल का?

भोले बाबा सध्या फरार आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआरआरमध्ये त्याच नाव नाही. त्यामुळे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी मुख्य आयोजकासह इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल का? हे पाहण आता महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img