टी-20 विश्वचषक पटकवल्यानंतर प्रथमच भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) खेळण्यास उतरणार आहे. शनिवारपासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा प्रारंभ होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारताच्या नवोदित युवा संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहिल. यजमान झिंबाब्वे आणि भारत यांच्यातील या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4.30 वाजता प्रारंभ होईल. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आयसीसीची जिंकल्यानंतर आता शौकिनांच्या भारतीय खेळाडूंकडून अधिक अपेक्षा उंचावल्या आहेत. पण झिंबाब्वेच्या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या गैरहजेरीत गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंना दर्जेदार कामगिरीसाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाला झिम्बाब्वेने कडवी झुंज दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. झिम्बाब्वेने गेल्या 5 टी-20 सामन्यांमध्ये भारताला कडवी टक्कर दिली आहे. झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे, तर भारतीय संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. झिंबाब्वेचे नेतृत्व सिकंदर रजाक करत आहेत. भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान हरारे येथील तापमान 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वे, उत्तर गोलार्धात स्थित असल्याने, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये थंड हवामान अनुभवते. त्याचवेळी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की पावसाची शक्यता नाही.
अनेक नवोदित क्रिकेटपटूंचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत-झिंबाब्वे दरम्यानच्या या टी-20 मालिकेत पदार्पण होत आहे. अभिषेक शर्मा पंजाबचा आणि आसामचा रियान पराग यांची झिंबाब्वे दौऱ्यासाठी संधी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी अधिक उठावदार झाल्याने निवड समितीने त्यांना दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, अष्टपैलु रविंद्र जडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता निवड समिती भारतीय संघाच्या पुर्नबांधणी करता नवोदित खेळाडूंना संधी देत आहे. झिंबाब्वेचा संघ म्हणावा तसा भक्कम प्रतिस्पर्धी नसला तरी ही मालिका त्यांच्या देशामध्ये खेळविली जात असल्याने भारताला गाफील राहून चालणार नाही.
मुख्यमंत्री शिंदेची टीम इंडियासाठी मोठी घोषणा, तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर
IND vs ZIM झिम्बाब्वेकडून हे खेळाडू चमकदार कामगिरी करण्याची शक्यता
पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा, तेंडाई चटारा, ल्यूक जोंगवे, वेलिंग्टन मसाकाझा हे खेळाडू गेमचेंजर ठरु शकतात. त्यामुळे या खेळाडूंना रोखण्याचे मोठे आव्हान युवा भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.
IND vs ZIM भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11
शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार.
IND vs ZIM झिम्बाब्वेची संभाव्य प्लेइंग 11
सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चटारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट केया, क्लाइव्ह एम, वेस्ली मेदवेरे, टी मारुमनी, वेलिंग्टन मसाकाझा.