लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) राज्यात महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) जोरदार यश मिळाले आहेत. त्यात काँग्रेसचे सर्वाधिक तेरा आणि एक अपक्ष असे चौदा खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा (Congress) आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मोठा भाऊ म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांना जास्त जागा हव्या आहेत. परंतु शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सध्या तरी मान्य करत नाही. त्यात तिन्ही पक्षाने सम-समान 96 जागा लढाव्यात हा फॉर्म्यूल्यावर चर्चा सुरू आहे.
लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जास्त जागा देऊन ते कमी जागा जिंकले आहेत. तर शरद पवार हे कमी जागा लढले आहेत. त्यामुळे विधानसभेला शरद पवारांना जास्त जागा हव्या आहेत. या परिस्थितीत जागा वाटपावरून गोंधळ झाल्यास स्वतंत्र लढण्याची वेळ येऊ शकते, याचा विचार काँग्रेसने आतापासून सुरू केला आहे. एक प्रकारे काँग्रेस स्वबळावर ही निवडणूक लढण्याची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.त्यातच राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसने (Congress) अर्ज मागवले आहे, याचा अर्थ काँग्रेसने विधानसभेसाठी प्लॅन बी एका अर्थाने तयार केला आहे. जागा वाटपात नाना पटोले हे आक्रमक आहे. त्यात नाना पटोले यांचे शिवसेनेचे संजय राऊत यांच्याशी वाद होतात हे जगजाहीर आहे. पटोले यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही सूत जुळत नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वरिष्ठांशी बोलून प्लॅन बी रेडी केल्याची राजकीय चर्चा आहे.
लवकरचं मुंबईला नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणार
Congress काही दिवसांत अर्ज मागवले
आठवड्याभरात हे अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्षांच्या मार्फत हे अर्ज मागविण्यात आले आहे. प्रदेश कार्यालयात हे अर्ज येत्या 10 जुलैपर्यंत जमा करायचे आहे. तसेच पक्ष निधी जमा करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न आहे. उमेदवारी इच्छुक असलेल्या उमेदवाराने पक्षनिधी म्हणून 20 हजार रुपये, द्यायचा आहे. तर महिला आणि अनुसूचित जाती, जमातीसाठी दहा हजार रुपये पक्षनिधी मागणी करण्यात आली आहे.