Hardik Pandya: २९ जूनला भारताने T20 वर्ल्डकप जिंकला आहे. त्यानंतर भारतीय संघाचे धुमधडाक्यात जंगी स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी पोस्ट व स्टोरी शेअर करत भारतीय संघाचे कौतुक केले. क्रिकेटरच्या पत्नीसुद्धा स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. गेल्या काही काळापासून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovik) यांची चर्चा रंगली होती. दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आधीपासूनच जोरदार सुरु होती त्यात आता त्या चर्चाना उधाण आलंय. दोघांमधील वाद टोकाला गेल्याचं सांगितलं जातंय. इतकंच नव्हे तर T20 वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी नताशा पोहोचली नाही. भारताने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरसुद्धा नताशाने एकही पोस्ट शेअर केलेली नाहीये. T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या घरी पोहोचला. पण, हार्दिकने फक्त मुलासोबत काढलेला फोटो व्हायरल झाला. नताशा हार्दिकच्या स्वागतासाठी उपस्थित नसल्याच्या विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकतंच पार पडलेल्या अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला हार्दिक पंड्याने हजेरी लावली होती. यावेळी हार्दिक नताशाला घेऊन संगीतला दाखल होईल अशी एक आशा सर्वानाच होती.
Hardik Pandya: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याच्या संगीत सोहळ्याला हार्दिक पंड्या हा नताशाला सोडून चक्क दुसऱ्यांसोबत दाखल झालेला. त्यामुळे आता हार्दिक पंड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चाना शिक्कामोर्तब असल्याचंच म्हंटल जातंय. हार्दिक पंड्या संगीत सोहळ्याला भाऊ कृणाल पंड्या आणि वाहिनी पंखुडी शर्मा यांच्यासोबत एकत्र दाखल झालेला. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, अनेकांनी थेट हार्दिकला विचारलं की, नताशा कुठे आहे? त्याच उत्तर न देता हार्दिक निघून गेलेला दिसला. कोणतंही फंक्शन असो किंवा पार्टी हार्दिक पंड्या सोबत नताशाला घेऊनच सहभागी होत असतो. मात्र, आता नक्की काय झालंय की, चक्क हार्दिक पंड्या नताशाला सोडून कार्यक्रमाला पोहचला आहे. दुसरीकडे नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. नताशाचे सतत फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करताना दिसत असते.
विधान भवनात रोहितची मराठीतून फटकेबाजी
भारतीय संघाने ज्यादिवशी T20 वर्ल्डकप जिंकला, त्यादिवशी नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नताशा जिममध्ये व्यायाम करताना दिसली मात्र, भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर एक साधी पोस्टसुद्धा शेअर केली नाही. गेल्या काही दिवसात नताशाला मुंबईतील बांद्रा परिसरात तिच्या एका मित्रांसोबत स्पॉट करण्यात आलेलं. त्यानंतर दोघांच्या विविध चर्चाही रंगल्याच पाहायला मिळालं.