6.2 C
New York

MegaBlock : रविवारी लोकलने प्रवास करण्याआधी वेळापत्रक नक्की पाहा

Published:

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे (MegaBlock) करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. या ब्लॉक काळात काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल गाड्या या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे जर उद्या कामानिमित्त किंवा सुट्टीसाठी बाहेर पडण्याचे नियोजन असेल तर लोकलचे वेळापत्रक तपासून बाहेर पडावे लागणार आहे.

रेल्वेच्या प्रसिद्धी विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणा आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला असून या काळात अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

MegaBlock मध्य रेल्वेवरील ब्लॉक

मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे सकाळी 9.46 ची सीएसएमटी ते बदलापूर, सकाळी 10.28 ची सीएसएमटी ते आसनगाव, दुपारी 3.17 ची कल्याण ते सीएसएमटी या जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. वसई रोड- दिवा मेमू सकाळी 9.50 ची कोपरपर्यंत चालवण्यात येणार आहे. तर कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यानच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच 11.45 ची दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच पनवेलपर्यंत रत्नागिरी-दिवा जलद पॅसेंजरचा लवण्यात येणार आहे.

लवकरचं मुंबईला नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणार

MegaBlock पश्चिम रेल्वे

वसई रोड ते विरार मार्ग स्थानक अप आणि डाऊन धीमा मार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 दरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आला असून या काळात रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

MegaBlock अप हार्बर-

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी 10.05 वाजता पनवेलहून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी 3.45 वाजता पनवेलहून सुटणार आहे.

MegaBlock हार्बर मार्गावरील ब्लॉक

कुर्ला ते वाशी दरम्यान हार्बर मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी – पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल या काळात रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान काही विशेष लोकल चाववण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img