23.1 C
New York

Pune Crime :  पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

Published:

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यात सर्वसामान्य नागरिक असुरक्षित असतांना आता पोलिस देखील सुरक्षित नसल्याचं पुढं आलं आहे. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पुण्यात वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या फरासखाना पोलिस ठण्याजवळ कर्तव्य बजावत असतांना एका महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत असतांना एकाने महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पुण्यात वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या फरासखाना पोलिस ठण्याजवळ कर्तव्य बजावत असतांना एका महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत असतांना एकाने महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ज्या काही घटना घडत आहेत. त्या घटनाच्यां पार्श्वभूमीवर पोलिसांना वरिष्ठांकडून रात्रीच्या वेळी बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना थांबून त्यांची तपासणी देखील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं एका गाडीला थांबवलं, गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर ड्रायव्हरनं महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

दीड हजार मिळवणं आणखी सोप्पं, सरकारने केला ‘हा’ मोठा बदल

Pune Crime नेमके काय झाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय साळवे दारु पिऊन गाडी चालवत असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली. मात्र त्यांने जबरदस्तीने पोलिसांच्या हातातील मशिन कारवाई करु नये यासाठी ओढून घेतले. मात्र पोलिसांच्या राग मनात धरुन आरोपीने सहायक पोलीस निरीक्षक जानकर यांच्या अंगावर आणि स्वत:च्याही अंगावर पेट्रोल टालेले. लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग लायटर उलटा पकडला असल्याने पेटली नाही.

Pune Crime ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात सुरू होती कारवाई, तेवढ्यात…

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. तेथे ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई सुरू होती. तेव्हा महिला पोलिसाने तेथे संजय याला अडवलं आणि त्याची चौकशी सुरू केली. मात्र तेवढ्यात त्याने महिला पोलिसावर पेट्रोल आणि रॉकेल टाकत तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा तिथे इतर पोलिस गस्तीला होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि सतर्कतने धाव घेत त्या आरोपीला रोखले आणि महिला पोलिसालाही वाचवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि महिला पोलिसाचाही जीव वाचला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img