Anant Ambani And Radhika Merchant Sangeet Ceremony : मुकेश अंबानी यांच्या घरी काल अनंत- राधिकाचा संगीत समारंभ पार पडला. या संगीत सोहळ्यात खास हॉलीवूडचा सर्वात प्रसिद्ध असणारा गायक जस्टिन बिबर (Justin Bieber) परफॉर्मन्स सादर करण्यासाठी एका दिवसासाठी परदेशातून भारतात आला होता. याव्यतिरिक्त या समारंभाराला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. रणवीर सिंह, सलमान खान, मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस, आलिया भट्ट, रणबीर कपूर,रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आणि बॉलीवूड्चे स्टारकिड्स असे सर्व मान्यवर अनंत -राधिकाच्या संगीताला उपस्थित होते.
Anant Ambani And Radhika Merchant Sangeet Ceremony : सध्या अंबानी कुटुंबात पार पडलेल्या संगीत सोहळ्याचे अनेक विडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता अशातच एका नवीन व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडिओमध्ये संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळतंय. नवीन सुनेच्या स्वागतासाठी सध्या मुकेश व नीता अंबानी हे जय्यत तयारी करताना दिसतायत. याचाच एक भाग म्हणून संगीत सोहळ्यात या कुटुंबांनी एक एक जन एन्ट्री करून नव्या सुनेसह सर्वानी डान्स केला आहे.
Anant Ambani And Radhika Merchant Sangeet Ceremony : शाह रुख खानचा २००७चा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातलं हे शीर्षक गीत उत्कृष्ट ठरलं होतं. कारण, या गाण्यात बॉलीवूडमधले असंख्य सेलिब्रिटी झळकले होते. त्यामुळे अंबानी कुटुंबांनी या गाण्यावर एकत्र डान्स करण्यासाठी निवड केली. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश व श्लोका, आणि होणारी नवीन सून राधिका व मर्चंट कुटुंबाचा होणारा जावई अनंत, अंबानी कुटुंबाची लाडकी लेक इशा व जावई आनंद पिरामलसुद्धा या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं आहे. अंबानी कुटुंबाने या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
डायन दिसतेस! “तू ब्लिच कर”,बोलणाऱ्यांना अभिनेत्रीने सुनावलं खडेबोल
येणाऱ्या १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकून त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. लग्नाचे सर्व विधी १४ जुलै पर्यंत पार पडणार आहेत. या दोघांच्या लग्नासाठी खास देश- विदेशातील पाहुणे उपस्थित राहणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या सर्व विधी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुंबईतील बीकेसी येथे पारंपरिक हिंदू पद्धतीने होणार आहेत.