21 C
New York

Ravindra Waikar : रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे

Published:

भूखंड घोटाळा प्रकरणत गुन्हा दाखल असलेले आणि त्यासाठी कुटुंबासह वारंवार न्यायालयात चकरा मारणारे रविंद्र वायकर आता गुन्हेमुक्त झाले आहेत. मुंबई महापालिकेने हा भूखंडाचा गुन्हा गैरसमजातून दाखल केल्याचं म्हणत मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटल्यानंतर जोगेश्वरीचे तत्कालीन आमदार आणि सध्याचे मुंबई उत्तरचे खासदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पुढच्या काळात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आले.

Ravindra Waikar रविंद्र वायकर यांच्यावर आरोप काय?

मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर झाला होता. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा हात असल्याचा आरोप होता. मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पावरील चर्चेला सविस्तर उत्तर

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेलं क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम झाल्याचा आरोप करण्यात आला होता. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या पालिकेच्या जमिनीवर बांधकाम झाल्याचे बोललं जात होतं. मुंबई महापालिकेच्या जागेवर असलेल्या या 5 स्टार हॉटेलची किंमत 500 कोटींच्या घरात असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी रविंद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ravindra Waikar रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे

आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविंद्र वायकरांना क्लीन चीट दिली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. यानंतर आता मुंबई महापालिकेने गैरसमजातून हा गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img