21 C
New York

Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीतून कोणाचीही माघार नाही; महायुती-मविआ चे असे आहे गणित…

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) जोरदार चर्चा आहे. आज या निवडणुकीत (Legislative Council Elections) अर्ज माघारी घेण्यासाठी अखेरची मुदत होती. मुदत संपल्यानंतर या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार मिलींद नार्वेकर यांनी (Milind Narvekar) उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. आता विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 उमेदवार असल्याने निवडणूक होणार आहे. या जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना अर्ज मागे घ्यायला लावून त्यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यावर चर्चा सुरु होती. अमोल काळे यांचे नुकतेच निधन झाल्याने हे अध्यक्षपद रिक्त होते. पण ही चर्चा अयशस्वी झाल्यानंतर नार्वेकरांनी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे.

त्यामुळे मतांची फाटाफूट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. संख्याबळाचा विचार केला तर भाजप 103, शिंदे गट 39, अजित पवार गट 40 असे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या पाच उमेदवारांना विजयासाठी 115 आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. म्हणजेच 12 मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे 9 आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे आणखी तीन मते मिळवणे महायुतीसाठी अशक्य नाही.

काँग्रेसचे 37 मते असून त्यांनी फक्त प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडे 14 मते अतिरिक्त राहतील. आता ही 14 मते ठाकरे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. काँग्रेसची ही मते मिळाली तर महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार मिलींद नार्वेकर निवडून येतील अशी परिस्थिती आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचाही अर्ज आहे. परंतु, त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे फक्त एकच मत आहे. शरद पवार गटाचा त्यांना पाठिंबा आहे. शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत. याशिवाय सपा आणि माकपाची तीन मते जयंत पाटलांना मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त आणखी सात मतांची तजवीज त्यांना करावी लागणार आहेत.

कोणत्या पक्षाचे उमेदवार रिंगणात?

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत

शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img