8.4 C
New York

Rohit Sharma : विधान भवनात रोहितची मराठीतून फटकेबाजी

Published:

मुंबई

मुंबईतील विधानभवनात टी 20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) विजयी संघातील 4 मुंबईकर (Mumbai Vidhan Bhavan) खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आहे. विधानभवनातील (Vidhan Bhavan) सेंट्रल हॉलमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विधानभवनात झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मराठीत भाषण केले. यावेळी त्याने T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) घेतलेल्या कॅचवर त्याचं कौतुक केलं. तसेच तो म्हटला जर सूर्याच्या हातात तो कॅच बसला नसता. तर मी त्याला बसवलं असतं. रोहितच्या या प्रतिक्रियावर सभागृहात हशा पिकला होता.

टी 20 विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाच्या मुंबईतील चार खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांचा जयघोष करण्यात आला. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. विधानभवनामध्ये अशा प्रकारे खेळाडूंचा कौतुक सोहळा पार पडला. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा बोलत होता

सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की, असा कार्यक्रम विधानभवनात आत्तापर्यंत झाला नाही. मात्र असा कार्यक्रम आमच्यासाठी झाला. याचा अत्यंत आनंद होत आहे. मुंबईत काल आमच्यासाठी झालेला जल्लोष हे आमचं स्वप्न होतं. भारतात विश्वचषक आणायचा ज्याची आम्ही अकरा वर्षांपासून वाट बघत होतो. हे सर्व यश माझ्यामुळे किंवा सूर्यामुळे नाही. तर संपूर्ण टीममुळे मिळालं आहे.

मला सर्वोत्कृष्ट टीम मिळाली होती. प्रत्येकाने वेगवेगळी भूमिका बजावत वेगवेगळ्या सामन्यांमध्ये आपल्याला जिंकवून दिलं. आत्ताच सूर्य कुमार म्हणाला की, माझ्या हातात कॅच बसला. बरं झालं त्याच्या हातात तो कॅच बसला नाही तर मी त्याला बसवलं असतं. असं म्हणत रोहितने T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचवर त्याचं कौतुक केलं आणि षट्कार लगावणारी प्रतिक्रिया दिली. रोहितच्या या प्रतिक्रियावर सभागृहात हशा पिकला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img