3.2 C
New York

Ravindra Waikar : रविंद्र वायकरांच्या निकालाचा वाद आता हायकोर्टात

Published:

मुंबई

मुंबई उत्तर पश्चिम (Mumbai North West) लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election) निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहोचला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या विजयावर संशय घेत पराभूत उमेदवार भरत शाह (Bharat Shah) यांनी रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

भरत शाह यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात काल ॲड. असीम सरोदे, ॲड. विनय खातु, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. किशोर वरक यांनी ही तक्रार याचिका दाखल केली. 4 जून रोजी झालेली मतमोजणी आणि जाहीर करण्यात आलेल्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img