अहमदनगर
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय आज महाविकास आघाडीच्या वतीने दूध आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुरुवात झाली असून पोलीस आणि निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं कळतंय. सध्या परिसरात तणापूर्व परिस्थिती आहे. खासदार निलेश लंके (Nilesh Lanke Protest) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जात असून महानगरपालिकेपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे.
खासदार निलेश लंके यांचे जनआक्रोश आंदोलन गेल्या चार तासापासून सुरूच आहे. जिल्हाधिकारी जोपर्यंत आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी घेतली आहे. दुधाला, कांद्याला भाव मिळत नसल्याने सकाळी अकरा वाजल्याापासून आंदोलन सुरू आहे.
दुधाला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी गळ्यात कांद्याची माळ घालत गाई आणि म्हशींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांसह मोर्चा काढलायं. यावेळी निलेश लंके यांनी बैलगाडीतून आंदोलन करत गळ्यात कांद्याच्या माळा परिधान केल्या होत्या. यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गाई, म्हशी यांच्यासह शेतकऱ्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळी व बैलगाडीवरून जिल्हाधिकारी कार्यालयवर आगेकूच केली. यावेळी गेटजवळच सर्व आंदोलकांना रोखण्यात आले. दुधाच्या दरावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, दूधाला चाळीस रुपये प्रति भाव मिळावा तसेच हे आमच्या हक्काचे आहे. गुजरातमध्ये प्रतिलिटर 40 ते 42 रुपये भाव मिळतोयं. शेतीप्रधान महाराष्ट्रातच दुधाच्या दराची अशी अवस्था असेल तर शेतकरी गप्प बसणार नसल्याचा इशारा निलेश लंके यांनी दिलायं.
दरम्यान, दुधाच्या दराबाबत मंत्री गोयल यांना आम्ही सुप्रिया सुळे यांच्यासह भेटलो. मंत्री विखे हे दुधाच्या प्रश्नासाठी गृहमंत्र्यांना भेटले मात्र लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याच्या दुधाला बाजार भाव मिळाला पाहिजे. आम्ही केवळ एवढ्या वरच न थांबता महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे देखील लाखो शेतकऱ्यांचे उपस्थितीमध्ये मोठ्या जनआंदोलन उभा करू, असा इशारा देखील यावेळी लंके यांनी सरकारला दिलायं.