26.6 C
New York

​NEET PG Exam : नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार

Published:

नवी दिल्ली

नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता नीट पीजी (NEET PG Exam) परीक्षा 11 ऑगस्ट 2024 ला दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. NTA ने SOP आणि प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. तुम्हाला सांगतो की NTA ने याआधी NEET PG परीक्षेची तारीख रद्द केली होती.

विद्यार्थी नीट पीजी परीक्षेचं नवं वेळापत्रक एनबीईची वेबसाईट natboard.edu.in वर पाहू शकतात. नीट पीजी परीक्षा ही नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार, नेट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आली होती. जे विद्यार्थी 23 जून रोजी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET PG मध्ये बसणार होते ते NBE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नवीन तारीख तपासू शकतात. या NEET PG परीक्षेशी संबंधित अधिक माहिती विद्यार्थ्यांना लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर दिली जाईल. नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, त्याचा कटऑफ १५ ऑगस्टपर्यंत जारी केला जाईल.

नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार नीट पीजी परीक्षेचं आयोजन 11 ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. यानंतर या परीक्षेची कट ऑफ डेट 15 ऑगस्टला जाहीर होईल. परीक्षेसंदर्भातील आणखी माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img