25.1 C
New York

PM Narendra Modi : मोदींच्या भेटीत नायडूंची मोठ्ठी लिस्ट; गडकरींवरही दबाव

Published:

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू दिल्ली (Chandrababu Naidu) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Narendra Modi) भेट घेतली. दोन्ही नेत्यांत वीस मिनिटे चर्चा झाली. भेटीची जरी कमी असली तरी नायडूंची मागण्यांची यादी खूप मोठी होती. आंध्र प्रदेशसाठी (Andhra Pradesh) स्वतंत्रपणे बजेटची तरतूद करावी, केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये आंध्र प्रदेशला प्राधान्य द्यावे या प्रमुख मागण्या होत्या. या मागण्यांसाठी नंतर त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अन्य मंत्र्यांची भेट घेतली.

नायडूंना या गोष्टीची जाणीव आहे की आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळू शकत नाही. त्यामुळे आता त्यांना विशेष राज्याच्या मागणीला मुरड घालत राज्यासाठी स्पेशल पॅकेजची मागणी सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायडूंनी आंध्र प्रदेशवरील 13 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा मुद्दा पीएम मोदींसमोर (PM Modi) उपस्थित केला.अमरावती शहराला राजधानीच्या रुपात विकसित करण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. यासाठी निधीची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत जर केंद्र सरकारने मदत केली तर कामे वेगात सुरू होतील. याव्यतिरिक्त राज्यातील रस्ते, पूल बांधकाम, धरणे, सिंचन योजना वेगात पूर्ण करण्यासाठी नायडूंनी वेगळ्या पॅकेजची मागणी केली.

जगातील ‘या’ दहा देशांत प्रचंड गरीबी, उत्पन्नातही घट

नायडूंचे म्हणणे होते की उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुंदेलखंडासाठी ज्या पद्धतीने सरकारने ज्या पद्धतीने वेगळ्या योजना तयार केल्या आणि स्पेशल पॅकेजची मागणी केली त्या पद्धतीने आंध्र प्रदेशचाही विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर चंद्रबाबू नायडूंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gakari) यांचीही भेट घेतली. या दरम्यान त्यांनी महामार्ग विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी केली. काही योजनांची माहिती त्यांनी गडकरींना दिली. यानंतर नायडूंनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांची भेट घेतली. आज नायडू दिल्लीत (New Delhi) असून आणखी काही मंत्र्यांची भेट घेणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img