टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाची भव्य दिव्या अशी विजयी मिरवणूक मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत पार पडली. लाखोंचा जनसागर मरीन ड्राइव्ह परिसरात गोळा झाला होता. आपल्या लाडक्या क्रिकेटप्रेमींना बघण्यासाठी चाहते चांगलेचा आतुर झाले होते. यानंतर वानखेवर खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मराठीत बोलत चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली. आपण World Cup जिंकलोय, नाचायला पाहिजे असं रोहित शर्मा म्हणाला.क्रीडाचाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करताना सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते. यानंतर वानखेडे स्टेडियमवर एका छोटेखानी कार्यक्रमात भारतीय खेळाडुंचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रसारमाध्यमांशी मराठीत संवाद साधला. त्याने विश्वचषक जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित म्हणाला, “वर्ल्डकप जिंकल्याचा सर्वांनाच फार आनंद झाला आहे. तब्बल 11 वर्षांनंतर वर्ल्डकप ट्रॉफी भारतात आली आहे. त्यामुळे सर्व भारतीय फार खुशीत आहेत. निवृत्ती घेण्याची ही अगदी योग्य वेळ होती. 2007 चा वर्ल्डकप माझ्यासाठी तितकाच स्पेशल होता आणि आताचा हा वर्ल्डकप पण तितकाच खास आहे.असं रोहित म्हणाला. यावेळी त्याला स्टेडियम मध्ये केलेल्या डान्स बाबत विचारलं असता, भारताने वर्ल्डकप जिंकला आहे त्यामुळे आपण नाचायला पाहिजे असं रोहित शर्माने म्हंटल. रोहित शर्माला मराठीत बोलताना पाहून चाहत्यांना सुद्धा आनंद झाला.
विश्वचषकच्या बक्षीसाच्या रक्कमेची वाटणी कशी होते ?
Rohit Sharma रोहित शर्माचा वानखेडेवर गणपती डान्स
दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर विजयाचा आनंद साजरा करताना टीम इंडियाच्या खेळाडुंनी मैदानाला फेरी मारली. यावेळी ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्मा स्वतावर आवर घालू शकला नाही. त्याने चांगलचह ठेका धरला आणि नाचायला सुरुवात केली. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनीही नाचायला सुरुवात केली. क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त आनंद देणार असं हे दृश्य होते. वानखेडे स्टेडियमवर भारतीय खेळाडुंचा सन्मान करण्यात आला.