23.1 C
New York

Team India : मुख्यमंत्री शिंदेची टीम इंडियासाठी मोठी घोषणा, तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर

Published:

मुंबई

भारतीय क्रिकेट (Team India) संघाने टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा 29 जून रोजी जिंकली. या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कपवर नाव कोरले. यासाठी आता महाराष्ट्र शासनाकडून भारतीय संघाला मोठं बक्षीस देण्यात आलं. मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जगज्जेत्या टीम इंडियासाठी 11 कोटींचं बक्षीस जाहीर (Team India Price Money) केलं आहे.

टी 20 विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाच्या मुंबईतील चार खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. य़ा वेळी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जगज्जेत्या टीम इंडियासाठी 11 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर विधान भवनातही या खेळाडूचे आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा गौरव सोहळा पार पडला. दरम्यान, यापूर्वीच महाराष्ट्राच्या चारही खेळाडूंना १ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण भारतीय संघासाठी ११ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. त्याचबरोबर आगामी काळात नव्या स्टेडियमसाठी जमीनीची वैगरे गरज भासल्यास त्यासाठीही मदतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img