16.7 C
New York

Worlds Poorest Countries : जगातील ‘या’ दहा देशांत प्रचंड गरीबी, उत्पन्नातही घट

Published:

जगभरात असे अनेक देश आहेत जे सध्या गरिबीच्या (Worlds Poorest Countries) संकटाचा सामना करत आहेत. आफ्रिका आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये या समस्येची तीव्रता अन्य देशांच्या तुलनेत जास्त आहे. येथील लोकांचे उत्पन्नही कमी आहे. जगातील गरीब देशांतील लोकांचे रोजचे उत्पन्न इतके कमी आहे की दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करणेही त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सन 2024 मध्येही जगातील अनेक देशांना गरिबीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जगातील दहा सर्वात गरीब देशांची माहिती घेऊ या..

World’s Poorest Countries दक्षिण सुदान


जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत दक्षिण सुदान पहिल्या क्रमांकावर आहे. या देशात गरिबीने आपली पाळेमुळे अतिशय घट्ट रोवली आहेत. त्यामुळे सरकारने कितीही प्रयत्न केले तरी गरिबी कमी होण्याचे नाव घेत नाही. या देशातील प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न जवळपास 495 डॉलर म्हणजेच 41 हजार 173 रुपये इतके कमी आहे.

World’s Poorest Countries बुरुंडी


जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. बुरुंडी प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोक शेती करतात. देशातील जातीय तणाव आणि राजकीय अस्थिरता देशाच्या आर्थिक विकासात सर्वात मोठे अडथळा आहेत. प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 963 डॉलर म्हणजेच 78 हजार 250 रुपये इतके आहे.

Worlds Poorest Countries मध्य आफ्रिका गणराज्य


मध्य आफ्रिकी गणराज्य यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिरे आणि लाकूड मुबलक प्रमाणात असूनही देशातील लोक गरिबी, अस्थिरता आणि अविकसितपणा या समस्यांना तोंड देत आहेत. या देशात प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1140 डॉलर म्हणजेच 95 हजार 261 रुपये इतके आहे.

Worlds Poorest Countries कांगो


नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या कांगो देशात गरिबी मोठी समस्या आहे. देशाचा आर्थिक विकास नसल्यासारखाच आहे. देशातील संघर्ष, भ्रष्टाचार आणि नियोजनाचा अभाव या समस्यांमुळे देश गरिबीच्या गर्तेत ढकलला गेला आहे. देशातील लोकांचे उत्पन्नही कमीच आहे. प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1593 डॉलर (131193 रुपये) इतकेच आहे. गरीब देशांच्या यादीत हा देश चौथ्या क्रमांकावर आहे.

Worlds Poorest Countries मोजाम्बिक


कमी साक्षरता दर, मूलभूत सुविधांचा अभाव आणि नैसर्गिक संकटांमुळे मोजाम्बिकमध्ये गरिबी घर करून राहिली आहे. याच कारणांमुळे मोजाम्बिक जगातील पाचवा गरीब देश ठरला आहे. येथील प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1650 डॉलर म्हणजेच 1 लाख 37 हजार 878 रुपये इतके कमी आहे.

Worlds Poorest Countries मलावी


मलावी हे देश देखील कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांची कमतरता असल्यामुळे देशात गरिबीच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1710 डॉलर म्हणजेच 1 लाख 42 हजार 892 रुपये इतके आहे.

ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीयांची उडी

Worlds Poorest Countries नायजर


गरीब देशांच्या यादीत नायजर हा देश सातव्या क्रमांकावर आहे. शिक्षणाची दुरवस्था आणि आरोग्य व्यवस्थेची कमतरता या कारणांमुळे देशाला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. या देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर अवलंबून आहे. देशातील लोकांचे उत्पन्नही कमीच आहे. प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1730 डॉलर म्हणजेच 1 लाख 44 हजार 543 रुपये इतके आहे.

Worlds Poorest Countries चाड


तेल निर्यातीवर चाड देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाचा हा मुख्य स्रोत आहे. असे असतानाही देशात गरिबी वाढली आहे. अनेक दशकांपासून येथील जनता गरिबीला तोंड देत आहे. यामुळे चाड देश गरीब देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. येथील उत्पन्न प्रति व्यक्ती 1860 डॉलर म्हणजेच 1 लाख 55 हजार 427 रुपये इतके आहे.

Worlds Poorest Countries लायबेरिया


आयरन आणि रबर भरपूर प्रमाणात उपलब्ध असणारा देश म्हणजे लायबेरिया. या वस्तूंना विदेशातून मोठी मागणी असतानाही देशाची अर्थव्यवस्था पाहिजे तितकी सुधारलेली नाही. आजही हा देश गरीब म्हणूनच गणला जातो. गृहयुद्ध, भ्रष्टाचार आणि कमकुवत संस्थानाचा वारसा या कारणांमुळे हे देश गरिबीचा सामना करत आहे. येथे प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1880 डॉलर म्हणजेच 1 लाख 57 हजार 98 रुपये इतके आहे.

Worlds Poorest Countries मेदागास्कर


गरीब देशांच्या यादीत मेडागास्कर देश दहाव्या क्रमांकावर आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. देशातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. देशात गरिबीची समस्या कायम आहे. ही समस्या कमी करून लोकांचे राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. येथील प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1990 डॉलर म्हणजेच 1 लाख 66 हजार 290 रुपये इतके कमी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img