पावसाने राज्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे, तर पावसाची काही भागात प्रतीक्षा आहे, सध्या मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये कोसळत आहे. आज देखील हवामान विभागाकडून (IMD)राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) पुढील 24 तासांमध्ये आता विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विजा देखील कड कडणार आहेत. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळ आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
आज मुंबईचे तापमान हे 35° c च्या आसपास राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. पावसासोबत (Weather Update) हवामान विभागाने वादळी वाऱ्याचा देखील इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक हे पर्यटनाला जातात. परंतु सध्या पावसाचा वेग आणि वाऱ्याचा वेग दोन्ही जास्त प्रमाणत वाहत असल्याने प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकाडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.पुणे शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.
जगातील ‘या’ दहा देशांत प्रचंड गरीबी, उत्पन्नातही घट
Weather Update कोसळणार मुसळधार
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मान्सूनची घाटमाथ्यावर सक्रियता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात आवक वाढून जल साठवण टक्केवारीच्या मापनास सुरवातही होवु शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
दरम्यान, गुरुवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणात सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी येथेही जोरदार पाऊस झाला. सध्या विदर्भात मुसळधार पावसाचे वातावरण असले तरी, हलक्या सरी वगळता फारसा जोरदार पाऊस पडलाच नाही. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही अद्याप हीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य व्यापलेला मान्सून कधी धो धो बरसणार याचीच प्रतिक्षा अनेकांना आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाने आता हीप्रतिक्षा संपल्यात जमा आहे.