5.5 C
New York

Bigg Boss OTT3: डायन दिसतेस! “तू ब्लिच कर”,बोलणाऱ्यांना अभिनेत्रीने सुनावलं खडेबोल

Published:

Bigg Boss OTT3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ (Bigg Boss OTT3) हा कार्यक्रम चालू झाल्यापासूनच चर्चेत आहे. कधी स्पर्धकांमध्ये वाद तर कधी नवनवीन दिलेले टास्क नेहमीच चर्चेत असतात. आता बिग बॉस तिसऱ्या सिझनमधली स्पर्धक पौलोमी दासला (Poulomi Das) अचानक घरातून बाहेर पडावं लागल्याने ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. पौलोमी दासला नेहमीच तिच्या रंगावरून ट्रोल केलं जातं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी तिने संवाद साधताना आपल्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलच खडेबोल सुनावलं आहेत.

Bigg Boss OTT3: पौलोमी दास म्हणाली की, मला माझ्या रंगावरून नेहमीच ट्रोल केलं जात. तू डायन आहेस, रात्रीची तू दिसणार नाहीस, काळे तू तुझा रंग घासून काढ, फेअर अँड लवली लाव, तू ब्लिच कर, अशाप्रकारच्या बऱ्याच कमेंट्स मला माझ्या रंगावरून केल्या जातात. ज्या लोकांनी मला फेअर अँड लवली लावण्याचा सल्ला दिला आहे, त्या लोकांना मला एकच सांगायचं आहे की मी ‘ग्लो अँड लवली’चा चेहरा होते. त्या क्रीमच्या जाहिराती मी केल्या आहेत. आणि आज मी जे काही आहे ना, ते फक्त माझ्या रंगामुळे आहे. याच रंगासोबत माझा जन्म झालाय आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. आज मी कॅमेरासमोर वेगळी जरी दिसत असले तरी ते दिसणं माझ्या रांगामुळेच आहे. माझ्या रंगाची मला अजिबातच लाज वाटत नाही. तुम्हाला तस काही वाटत असेल तर तो तुमच्या विचारांचा दोष आहे आणि मला फरकसुद्धा पडत नाही की ,तुम्ही लोक याचा काय विचार करता. मला माझा रंग घासायची गरज नसून तुम्हाला तुमचे विचार डोक्यातून साफ करायची गरज आहे असं पौलोमी दासने म्हटलं आहे.

 वनतारा थीमने सजलेला रथ! अन् अनंत-राधिकाची ‘मामेरू’ कार्यक्रमात जंगी एन्ट्री

Bigg Boss OTT3: यासोबतच तिने तिच्या कपड्यांवरून होण्याऱ्या टीकेलासुद्धा सुनावलं आहे. पौलोमी पुढे म्हणाली की, ज्या कपड्यात मला कम्फर्टेबल वाटत, तेच कपडे मी परिधान करते. बिकिनीमध्ये मला अवघडल्यासारखं नाही वाटत त्यामुळे मी तसेच कपडे जास्त वापरते. जर तुम्हाला ते कपडे नसतील आवडत तर तुम्ही तसे कपडे नका वापरू. मी सलवार सूटसुद्धा परिधान करते, साडीदेखील नसते. माझ्या घरी माझ्या आई-वडिलांना मी परिधान केलेल्या कपड्यांबद्धल कोणतीच अडचण नाहीये; मग तुम्हाला का आहे ? महत्वाचं म्हणजे कोणीतरी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी, असा माझा कधीच प्रयत्न नसतो. जे मला आवडतं, ते मी परिधान करते, असं म्हणत पौलोमी दासने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावलं आहे.

‘बिग बॉस’ ने घरातल्या सदस्यांना एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये चंद्रिका दीक्षित, मुनीषा खटवानी, पौलोमी दास, शिवानी कुमारी, नॅजी व विशाल पांडे हे सदस्य घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते. दिलेला टास्क करून शिवानी कुमारी, नॅजी, विशाल व चंद्रिका दीक्षित हे सदस्य घराबाहेर जाण्यापासून वाचले. मात्र, हा टास्क पूर्ण करू न शकलेल्या पौलोमी व मुनीषा या दोघींपैकी एका स्पर्धकाला एलिमिनेट करण्याचा निर्णय लव्ह कटारिया याला देण्यात आला होता. लव्ह कटारियाने पौलोमीचे नाव घेतलं त्यामुळे ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातून पौलोमी दासला घराबाहेर जावं लागलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img