22.3 C
New York

Alpha Movie: ‘स्पाय युनिव्हर्स’मध्ये आलिया भटची धमाकेबाज एंट्री! सोबत झळकणार मुखमंत्र्यांची नात

Published:

Alpha Movie: शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण'(Pathan) चित्रपटामुळे सध्या ‘YRF स्पाय युनिव्हर्स’ची (YRF Spy Universe) जोरदार चर्चा रंगली आहे. ‘टायगर ३’ आणि ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली होती. त्यामुळे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पाय युनिव्हर्सने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘स्पाय युनिव्हर्स’मध्ये नवीन काय पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना कायम होती. यावेळी स्पाय युनिव्हर्समध्ये लेडी ऑफिसरची एन्ट्री झाली आहे. आणि ती कोण ? तर ती म्हणजे सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आलीया भट्ट.(Alia Bhatt) यशराज फिल्म्सने नुकतंच YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड चित्रपटाची घोषणा केली आहे. इतकंच नव्हे तर अजून एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. नुकतंच MDbच्या ‘Popular Indian Celebrities’च्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणारी ‘मुंज्या’ फेम शर्वरी वाघसुद्धा (Sharvari Wagh) झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘अल्फा’ (Alpha) असं आहे.

‘अल्फा’मध्ये आलिया-शर्वरी आहेत सुपर एजंट
Alpha Movie: बॉलीवूडची सुपरस्टार असलेली अभिनेत्री आलीय भट्ट आदित्य चोप्राच्या (aditya Chopra) YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फिमेल लीड चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट सोबत अभिनेत्री शर्वरी वाघ ही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आदित्य चोप्रा यांनी YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील ‘अल्फा गर्ल्स’ म्हणून या दोघींच्या चित्रपटाला प्रेझेंट केलं आहे. आता केवळ पुरुषच नाही तर महिलासुद्धा अल्फा असू शकतात, हा एक वेगळा संदेश ‘अल्फा’या चित्रपटातून देण्यात येणार आहे. चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं असून ‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रवैल याच दिग्दर्शन करणार आहेत. मुंबईमध्ये शूटिंग झाल्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग परदेशातदेखील करण्यात येणार आहे. आलीय भट्ट या चित्रपटात एक रोकटोक अंदाजात दिसणार आहे. तसंच या चित्रपटात काही अ‍ॅक्शन सीन सुद्धा करावे लागणार आहेत त्यामुळे अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून मेहनतसुद्धा घेत आहे.

“केस परत वाढतील”, हिना खानने घेतला मोठा निर्णय!

अल्फा स्पाय युनिव्हर्सला पुढे घेऊन जाणार
Alpha Movie: स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड चित्रपटाला अ‍ॅक्शन स्पेक्टेकल बनवण्यासाठी कोणतीच कसर सोडणार नाहीत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शिव रावल (Shiv Rawal) यांच्या हाती दिली आहे. शिव रावल यांनी ‘द रेल्वे मॅन’ या ब्लॉकबस्टर सीरिजचे दिग्दर्शन केलं होत. ‘अल्फा’ या चित्रपटात ‘पठाण’ चित्रपटाचे अ‍ॅक्शन दिग्दर्शक केसी ओ’नील हेच अ‍ॅक्शन कोरिओग्राफीची जबाबदारी सांभाळतील. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांची या चित्रपटात नेमकी काय भूमिका असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

एक था टायगर,’ ‘टायगर जिंदा है,’ ‘पठाण,’ ‘टायगर ३’ या सर्व स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटांनी आधी ब्लॉकबस्टर यश मिळवले. ‘वॉर २’ हा चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळेच ‘अल्फा’ सिनेमासुद्धा या स्पाय युनिव्हर्सला सक्षमतेने पुढे घेऊन जाईल, असा सर्वानाच विश्वास आहे. या चित्रपटात आलीया आणि शर्वरी या दोघी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. पण, या चित्रपटात २ सुपरस्टार कॅमिओ म्हणून एन्ट्री करणार की नाही हे पाहणंदेखील तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img