22.9 C
New York

Ajit pawar : जयंतरावांचे कौतुक करताना अजितदादांची फटकेबाजी

Published:

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी लीक झाला असं म्हणत टीका केली. दरम्यान, अर्थसंकल्पात अंदाजे काही बातम्या किंवा काही माहिती माध्यम देत असतात. आणि त्यामध्ये काह गैर नाही. ते माध्यमांचं कामच आहे. मात्र, सुमारे ९ वेळा अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी असे प्रश्न उपस्थित करणं हे कठीण आहे अशा शब्दांत अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी काहीशी खंत व्यक्त करत झालेल्या टीकेला उत्तर दिलं. तसंच, जयंतराव आपण राज्याचा ९ वेळा अर्थसंकल्प मांडला. आता मी दहावेळा मांडला. त्यामुळे तुमचा रेकॉर्ड मी मोडला आहे असा उल्लेखही अजित पवारांनी यावेळी केला.

Ajit pawar ज्येष्ठ सदस्य आहेत

विरोधी पक्षांकडून काही सुचना केलेल्या आहेत. त्यामध्ये काही कामाच्या सुचना असतील तर त्याचं स्वागतच आहे. त्यांचा जरूर विचार करणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, काही हरकत नाही. हे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित करणं हे लोकशाहीत चांगलीच गोष्ट आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

सभागृहात अजितदादांकडून वडेट्टीवारांंसाठी खास शायरी…

Ajit pawar मनुष्य स्वभावच तसा

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटत की विरोधात असलं की अर्थसंकल्पावर टीका करायची. सत्तधारी असलं की अर्थसंकल्पाचं समर्थन करायचं. आता मला दोन्ही बाजून अर्थसंकल्पा मांडण्याची संधी मिळाली आहे. परंतु, हा मानवी स्वभावच आहे. त्यामुळे त्यावर तरी काय बोलाव असं म्हणत अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img