19.7 C
New York

Vasant More : वसंत तात्या ‘या’ दिवशी बांधणार ठाकरेंचं शिवबंधन

Published:

लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि.4) मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर आता ते 9 जुलै रोजी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. वसंत मोरेंनी (Vasant More) आज (दि.4) शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचितचा (vanchit) मार्ग निवडला होता. (Uddhav Thackeray) त्यांनी वंचितमधून पुणे लोकसभाही लढवली होती. मात्र, त्यांना मोठ्या परभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर आता मोरेंनी वंचितसह प्रकाश आंबेडकरांना गुड बाय करण्याचं निश्चित केले असून, येत्या 9 जुलै रोजी वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Vasant More आमदारकीसाठी झाली चर्चा?

येत्या काळात राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. मोरेंनी काही दिवसांपूर्वी खासदारकीचीही निवडणुक लढवली होती. मात्र, तेथे त्यांना दारूण पराभव झाला. त्यानंतर आता त्यांनी विधानसभेसाठी कंबर कसली असून,ते ठाकरे गटाकडून हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या भेटीत या जागांबाबतही ठाकरे आणि मोरेंमध्ये खलबतं झाली असल्याची शक्यता आहे.

नव्या जागांवरील दाव्याने महायुतीत ठिणगी?

Vasant More तर वसंत मोरेंच्या नावाचा विचार पक्का

हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यास वसंत मोरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असं बोललं जातय. मोरे हे मनसे सोडल्यानंतर वंचितमध्ये गेले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये शेवटपर्यंत राहील, मी सोडणार नाही असं मोरे म्हटले होते. मात्र, आता ठाकरेंच्या भेटीनंतर काय करतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. आज दुपारी त्यांची भेट होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img