21 C
New York

Team India : मरिन ड्राईव्ह परिसरात खबरदारीचे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना आदेश

Published:

मुंबई

भारताच्या संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (Narendra Modi) भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला. भारताच्या संघाने तब्बल १७ वर्षानंतर टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) जिंकला आहे. यानिमित्ताने भारतीय खेळाडूंचे जगभरामध्ये स्वागत केले जात आहे. भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवून विश्वविजेता झाला. दिल्लीमध्ये टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी काही आनंदाचे क्षण भारतीय क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले. देशातील विश्वविजेत्या खेळाडूंचा सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाँईट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. टि-२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai Police Commissioner) निर्देश दिले आहेत.

टि-२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाँईट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींना कोणताही त्रास होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img