मुंबई
विश्व विजेत्या टीम इंडियाच्या (Team India) स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. टीम इंडियाची इथूनच विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आपल्या क्रिकेट चाहत्यांनी झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. थोड्याच वेळात या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी आता होऊ लागली आहे. ही मिरवणूक मरीन ड्राईव्ह (Marine Drive) ते वानखेडे स्टेडियमपर्यंत (Wankhede Stadium) असणार आहे.
टीम इंडिया राजधानी दिल्लीतून आर्थिक राजधानी मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर पोहचले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू सहकुटुंब बाहेर पडले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आता क्रिकेट चाहते प्रतिक्षा करत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर पोहचले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रतिक्षा केली जात आहे. थोड्याच वेळात रोहितसेना वर्ल्ड कप ट्रॉफीसह एन्ट्री घेणार आहे. हा क्षण आपल्या मोबाईल आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी असंख्य क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर दाखल झाले. खेळाडूंना घेण्यासाठी 2 बस आल्या होत्या. या बसेसने टीम इंडियाचे खेळाडू हे वानखेडे स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे. संघाने भारतात दाखल झाल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे. संघाने भारतात दाखल झाल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दिल्लीहून पंतप्रधानांची भेट घेऊन टीम इंडिला विस्तारा एअरलाईन्सनं खास विमानानं मुंबईत आणलं आहे. या विमानातच त्यांचं केक कापून सेलिब्रेशन केलं. विशेष म्हणजे मुंबई विमानतळावर या विमानाला विशेष असा वॉटर सॅल्युट देण्यात आला. याची दृश्येही समोर आली आहेत. ही दृश्ये पाहून तुम्हीही थक्क व्हालं. विमानातून खाली उतरण्यापूर्वीच विमानातच विस्तारा एअरलाईन्सच्यावतीनं केक कापून खेळाडूंचं स्वागत आणि सेलिब्रेशन करण्यात आलं. त्यानंतर टीम थेट वानखेडे स्टेडियमकडं रवाना झाली. या ठिकाणी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खेळाडूंची ओपन बसमधून रॅली निघणार आहे.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळामध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या खेळाडू जेव्हा विमानतळामधून बाहेर येतील, तेव्हा ढोल ताशाच्या गजरात खेळाडूंचा स्वागत केला जाणार आहे. कोणत्याही क्षणी टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होऊ शकते. मरीन ड्राईव्ह ते वानखडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक निघणार आहे. रोहित आणि टीम इंडिया ओपन बसमधून चषकासोबत चाहत्याचे अभिवादन स्विकारणार आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. तरीही विजयी मिरवणूक होणार आहे. चाहत्यांचा जल्लोष वाढला आहे.