मुंबई
ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे (Farmers) दूध उत्पादक (Milk Producers) शेतकऱ्यांनाही हमी भाव (Milk Guarantee Price) देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक (Milk Price) विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना दिली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित यांची दिल्ली मध्ये भेट घेवून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आजपर्यत महायुती सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहीती मंत्री अमित शहा यांना दिली.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा अशी अपेक्षा आहे.दूध उत्पादन व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.दूधाला हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारने सद्य परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता मंत्री विखे पाटील यांनी दोन दिवसांपुर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच सहकारी व खासगी दूध संघाच्या प्रतिनिधीची बैठक घेवून दुधाला ३०रुपये स्थायीभाव व ५ रुपये शासकीय अनुदान असा ३५ रुपये दर देण्याचा निर्णय घेत,यापुर्वी तीन महीन्याकरीता अनुदान दिले असल्याचे आवर्जून सांगितले.
दूध दरामध्ये होणारी चढ उतार लक्षात घेवून हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारने विचार करण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेली विनंती मान्य करून दूधाच्या हमी भावाबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार निश्चित याबाबात सकारात्मक विचार करेल आशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिली.