4 C
New York

Sanjay Raut : बहीणप्रमाणे लाडका शेतकरी योजना आणा, राऊतांची मागणी

Published:

मुंबई

शिंदे सरकारच्या वतीने राज्यातील महिलांकरिता 28 जून रोजी अर्थसंकल्पामध्ये (Budget) मोठी घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) अर्थसंकल्प जाहीर करताना राज्यातील महिलांकरिता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये महिना देण्यात येणार आहे. आता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेतकऱ्यांसाठी देखील लाडका शेतकरी योजना (Ladka Shetkari Yojana) जाहीर करावे अशी मागणे केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, अमरावतीमध्ये जून महिन्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्रातही नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. यामुळे व्यथित झालेल्या राऊत यांनी लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका शेतकरी योजना आणवी. कारण लाडक्या बहीणीला, लाडक्या भावाचा लाडका शेतकरी हा सुद्धा भाऊच आहेस, असे राऊतांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, तर, महाराष्ट्रात रोज 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत. जानेवारी महिन्यात 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भात अमरावती येथे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहेत. यावर अर्थमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेले नाही. लाडक्या बहिणीचा भाऊ शेतकरी असून तो आत्महत्या करतो. यामुळे राज्यात दु:खाचे सावट आणि अंधःकार पसरला आहे, असे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img