21 C
New York

Ambadas Danve : अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत महत्वाची बातमी

Published:

मुंबई

शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं विधान परिषदेतून (Vidhanparishad) निलंबन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून निलंबनाचा पुनर्विचार करावा अशी मागणी सभापतींकडे केली होती. सभापतींनी अंबादास दानवेंच्या निलंबनावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना निलंबनातून (Suspension) सूट देण्यात आलेली आहे. पाच दिवसांऐवजी केवळ तीन दिवसांच्या निलंबनाची कारवाई दानवेंवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता दानवे शुक्रवारपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभाग घेतील.

अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना निलंबित केलं. अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात पाच दिवस सहभागी होता येणार नव्हतं. मात्र अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई सभापतींकडून मागे घेण्यात आली आहे.

दरम्यान, अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी  सलग दोन वेळा उपसभापती यांच्या दालनात बैठका पार पडल्या. एवढंच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली. अखेर दानवेंच्या निलंबनामध्ये सूट देण्यात आलेली आहे. ते उद्यापसून पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img