4.5 C
New York

CM Ladki Bahin Yojna : घरच्या घरी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल?

Published:

महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा (CM Ladki Bahin Yojna) केली होती. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म (mukhyamantri mazi ladki bahin yojana) भरण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी झुंबड उडाली आहे. प्रचंड गर्दीमुळे अनेक ठिकाणी महिलांना योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. हा फॉर्म घरच्या घरी मात्र, महिलांना ऑनलाईन पद्धतीनेही भरता येईल. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन तुम्हाला त्यावर नाव, पत्ता आणि इतर सगळे तपशील भरावे लागतील. त्यानंतर हा भरलेला फॉर्म पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करुन, तो आवश्यक ती कागदपत्रे जोडूनसबमिट करावा लागेल.

CM Ladki Bahin Yojna योजनेचा फॉर्म कसा भराल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज देण्यात आला त्यावर इतर सरकारी कामांसाठी आपण ज्याप्रकारे वैयक्तिक तपशील भरतो, तीच पद्धत वापरायची आहे. या फॉर्ममध्ये संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिनकोड ही माहिती महिलांना आधी भरावी लागेल. याशिवाय, तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही न विसरता अर्जात नमूद करावा. याशिवाय, अर्जात महिलांना वैवाहिक स्थितीच माहिती देणेही बंधनकारक आहे.

याशिवाय, या अर्जात तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. एखादी महिला सरकारी योजनेची लाभार्थी असेल तर तिला संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात, हे अर्जात नमूद करावे लागेल.

वसंत मोरे वंचितला बाय-बाय करणार ?

यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहेत, त्याचा तपशील भरावा लागेल. यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित बँकेचा IFSC Code हे सर्व तपशील अचूक भरावे लागतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे महत्त्वाचे आहे. त्याचा तपशीलही अर्जात नमूद करावा लागेल. अर्ज भरणारी महिला सगळ्या शेवटी कोणत्या वर्गात मोडते, हे स्पष्ट करावे लागेल. अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकर नसेल तर सामान्य गृहिणी या पर्यायासमोर खुण करावी.

CM Ladki Bahin Yojna कोण असणार पात्र?

  • महाराष्ट्र रहिवासी
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
  • 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

CM Ladki Bahin Yojna अपात्र कोण असेल?

  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
  • घरात कोणी Tax भरत असेल तर
  • कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन कुटुंबातील घेत असेल तर
  • 5 एकर पेक्षा जास्त जमीन कुटुंबात असेल तर
  • 4 चाकी वाहन कुटुंबातील सदस्यांकडे असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

CM Ladki Bahin Yojna लागणारी कागदपत्रे

उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , आधारकार्ड , रेशनकार्ड, बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.
ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img