Hina Khan: अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवली. हिना खान हे नाव कायमच चर्चेत असलेलं नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर तंगडी फॅन फॉलोईंग पाहायला मिळते. या मालिकेतून हिना खान सर्वांच्या घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे हिना खान आयुष्यातल्या एका वाईट काळातून जात असतानादेखील आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहे. अभिनेत्रीने काही दिवसांआधी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिला स्तनाचा कर्करोग झाल्याची एक पोस्ट शेअर करत याबद्धल माहिती दिली होती. हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून तो तिसऱ्या टप्याचा आहे. हिना खान चाहत्यांबरोबर ह्या खडतर प्रवासातला प्रत्येक टप्पा शेअर करताना दिसते. आता अभिनेत्री हिना खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती स्वतःचे केस कापताना दिसत आहे.
Hina Khan: हिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, हिना केस कापण्यापूर्वी खुर्चीवर बसली असताना हिनाची आई रडताना दिसतेय. हिना तिच्या आईला समजावतेय आणि म्हणते,”हे फक्तच केस आहेत, ते काय पुन्हा वाढतील. तूसुद्धा केस कापतेस ना मग तेसुद्धा वाढतात. तू स्वतःला आता त्रास करून घेऊ नकोस नाही तर तुझी तब्बेत बिघडेल”. हिना पहिल्यांदा स्वतःचे केस कापते. त्यानंतर केशकर्तनकार तिचे मागचे केस कापतो. हा विडिओ शेअर करत अभिनेत्रीने सुंदर आणि भावुक असं कॅप्शन लिहिलं आहे. हिनाने लिहिलंय की,” माझ्या आईने ज्या गोष्टींचा कधीच विचारसुद्धा केला नव्हता, तीच गोष्ट आज तिच्या डोळ्यांसमोर घडतेय. या व्हिडिओमध्ये माझ्या आईचा काश्मिरी भाषेतला आवाज तुम्हाला ऐकू येत असेल.”
Hina Khan: हिनाने पुढे लिहिलं की,”तिथे राहणाऱ्या सर्वच लोकांसाठी, विशेष म्हणजे स्त्रियांसाठी ज्या माझ्यासारख्याच लढाई लढत आहेत. मला माहितेय की, हे खूप कठीण आहे. मला हेही माहिती आहे की, आपल्यापैकी बहुतेकजणांसाठी आपले केस हा एक प्रकारचा मुकुटच आहे; जो आपण कधीही काढत नाही. पण, जर अशा कठीण लढाईच्या सामोर जावं लागतंय, तर तिथे तुम्हाला तुमचे केस, तुमचा अभिमान, तुमचा मुकुट हा गमवावाच लागेल; आणि जर का तुम्हाला जिंकायचं असेल, तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागतात.. आणि मी माझ्या आयुष्यात जिंकणं हा निर्णय निवडलाय.”
ही लढाई जिंकण्यासाठी मी स्वतःला प्रत्येक संधी देण्याचा निर्णय घ्यायचं ठरवलंय. माझे सुंदर केस गळण्याच्या आधीच मी माझे केस कापण्याचा निर्णय घेतला आहे. मला आठवडाभर हा मानसिक त्रास सहन करायचा नव्हता. कारण आता मला कळाल आहे की, माझ्या केसांचा खरा मुकुट हे माझा खरं धैर्य आहे, माझी शक्ती व माझं स्वतःवर असलेलं प्रेम आहे. आणि हा, या खडतर टप्प्यासाठी मी माझे स्वतःचे केस एक चॅन विंग बनविण्यासाठी वापरायचे ठरवलं आहे”,असंही हिनाने लिहिलंय.
हिना पुढे लिहिते,”केस पुन्हा वाढतील, भुवया परत येतील, डाग फिकट होत राहतील; परंतु तुमचा जो आत्मविश्वास आहे ना तो कायम राहिला पाहिजे. हा माझा प्रयत्न आहे जो तिथल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठीच मी माझी स्टोरी, माझा खडतर प्रवास रेकॉर्ड करते आहे. माझ्या या स्टोरीमुळे जर एखाद्याचा अनुभव चांगला होत असेल, तर ते खरचं खूप फायदेशीर आहे. तसंच जे लोक माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत, त्यांच्याशिवाय माझा हा दिवस अशाप्रकारे जाऊच शकला नसता.”
वनतारा थीमने सजलेला रथ! अन् अनंत-राधिकाची ‘मामेरू’ कार्यक्रमात जंगी एन्ट्री
“देव आमचं दुःख कमी करुदेत आणि आम्हाला विजयाचं सामर्थ्य देऊदेत. कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करा”,असं कॅप्शन लिहीत हिनाने तिच्या आई आणि मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत आणि हीनानं तिच्या केशकर्तनकाराचेही आभार मानले आहेत.