23.1 C
New York

Dombivli MIDC : पावसाळ्यात पाणीटंचाई; एमआयडीसी कार्यालयात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

डोंबिवलीजवळील आजदेगाव, आजदेपाडा आणि डोंबिवली जिमखाना येथील रहिवाशांनी गुरुवार 4 तारखेला सकाळच्या सुमारास यांनी डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात महिलावर्ग आपल्या लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाले.यावेळी भाजपचे माजी नगरसेवक विनोद काळण (Vinod Kalan) आणि मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण (Sanjay Chavan) हेही नागरिकांबरोबर आंदोलनात सहभागी झाले होते.

अनेक दिवसांपासून डोंबिवली जिमखाना राहिवासी आणि आजदेगाव, आजदेपाडा येथे पाण्याची मोठी समस्या भेदसावत आहे. अनेक वेळा पालिका प्रशासन आणि एमआयडीसी विभागाला सांगूनही पाणी पुरवठा योग्य दाबाने झाला नाही.अखेर संतापलेल्या येथील नागरिकांनी शुक्रवारी डोंबिवली एमआयडीसी विभागीय कार्यालयात जाब विचारीत ठिय्या आंदोलन केले.यानंतरही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर एमआयडीसी कार्यालयाची तोडफोड करू असा इशाराही दिला.

यावेळी भाजपा माजी नगसेवक विनोद काळण म्हणाले, एमआयडीसी विभागाला वारंवार सांगूनही हे विभाग पाणी संदर्भात गंभीर्याने लक्ष देत नाहीत. नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी भाजपने नेहमी जोरदार प्रयत्न केले आहे.येथील नागरिकांना मुबलक पाणीमिळेपर्यत प्रशासनाला जाब विचारणारच. तर मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण यांनी येथील नागरिकांना पाणी समस्यासाठी किती वेळा आंदोलन करणार ? प्रशासनालाही समजायला हवे कि पाणी नसेल नागरिकांचे हाल होतात.प्रशासनाने लवकरात लवकर येथीलनागरिकांची समस्या सोडविली पाहिजे.

ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने पाणी टॅकरमधून पाणी कसे पुरविले जाते असा प्रश्न उपस्थित केला. सर्वसामान्य नागरिकांना पाणी पूरवठा योग्य दाबाने मिळत नसेल तर प्रशासन पाणी बिल का मागते ?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img