सातारा
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) सत्संगाच्या कार्यक्रमातील चेंगराचेंगरी प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) जादूटोणा विरोधी कायदा (Anti Witchcraft Law) देशभर लागू करावा. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी, अशा महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. तसेच दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.
हाथरससारख्या घटनांना प्रत्यक्ष जबाबदार असणारे बाबा, बुवा, संबंधित प्रशासकीय अधिकारी हे नामानिराळे राहतात आणि काही प्याद्यांचा बळी दिला जातो. ही बाब लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.
अंनिसच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात करण्यात आलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि लोकांना फसवणे, हा गुन्हा आहे. असाच कायदा देशभर लागू केल्यास भोलेबाबासारख्या बाबांना आळा बसू शकेल, असा विश्वास अंनिसने व्यक्त केला आहे. राजकीय नेते मतांसाठी अशा बुवा, बाबांना पाठीशी घालतात. हे थांबण्याची आवश्यकता असल्याचंही अंनिसने म्हटलं आहे.