Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबात लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाली आहे. २ जुलैला पालघरमध्ये पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यानंतर काल, ३ जुलैला ‘मामेरू’ हा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. मुंबईमधील अंबानींचं घर अँटिलिया (Antilia) येथे ‘मामेरू’ हा कार्यक्रम पार पडला. ‘मामेरू’ ही एक गुजराती प्रथा आहे जी लग्नाच्या काही दिवस आधी केली जाते. यानुसार अनंत-राधिकाचा ‘मामेरू’ प्रथेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी आणि दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. आता विशेष म्हणजे ‘मामेरू’ या कार्यक्रमाला अनंत-राधिका यांच्या एन्ट्रीनेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांच्या एंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी यांच्या दुसऱ्या मुलाचं लग्न १२ जुलैला हिंदू पद्धतीने होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. पण मुकेश अंबानी यांनी लग्नाआधी बऱ्याच कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. अगदी वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची एंट्री या ‘मामेरू’ कार्यक्रमाला पाहायला मिळाली. यावेळी अंबानी-मर्चंट कुटुंब आणि सर्व उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी दोघांचं धुमधडाक्यात स्वागत केलं.
‘मामेरू’ या कार्यक्रमासाठी दोघांनी एक खास लूक केला होता. राधिका मर्चंटने गुलाबी आणि नारंगी रंगाचा लेहंगा परिधान केला होता; ज्याच्यावर सोन्याच्या जरीचं वर्क करण्यात आलं होतं. तर अनंत अंबानीने राधिकाला मॅच होईल असा सदरा आणि जॅकेट परिधान केला होता.
मंगळसूत्र, किराणा,अन् लाखाचा चेक! अंबानी कुटुंबाने ५० गरीब जोडप्यांना दिल्या ‘या’ भेटवस्तू
दरम्यान, २ जुलैला पार पडलेल्या पालघरमध्ये ५० गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याला खुद्द मुकेश अंबानी, नीता अंबानी, ईशा अंबानी पिरामल, आनंद पिरामल,आकाश अंबानी, श्लोका अंबानी यांची उपस्थिती होती. या सोहळ्याला अंबानी कुटुंबांनी नवविवाहित जोडप्यांना खास भेटवस्तू, १ लाखाचा चेक आणि लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी दिल्या. तसंच प्रत्येकी जोडप्याला भेटून आशीर्वादही देताना अंबानी कुटुंब पाहायला मिळालं.