23.1 C
New York

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांच्या तिजोरीत इतकी कोटीची संपत्ती

Published:

मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती तसेच शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना महाराष्ट्र सहसंपूर्ण देश परिचित आहे. शिवसेनेवर तसेच उद्धव ठाकरेंवर कुठलेही संकट आले तर संकट मोचक म्हणून देखील नार्वेकर यांची ओळख आहे. नार्वेकर विधान परिषदेच्या निवडणूक लढवत आहे. ठाकरे नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक आयोगाला (Election Commission) देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मिलिंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 11 कोटी पेक्षा अधिक संपत्ती आहे.

निवडणूक आयोगाला नार्वेकर यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे रोख रक्कम 45 हजार रुपये दर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे बँक अकाउंट मध्ये 74 लाख 13 हजार 243 रक्कम तर पत्नीकडे आठ कोटी 22 लाख 118 एवढी रक्कम आहे. तसेच नार्वेकर कुटुंबाकडे बीड दापोलीत शेतजमी, सोनं, हिरे आणि मुंबईत घर असल्याचा देखील प्रतिज्ञापत्रात म्हटला आहे.

नार्वेकर यांची संपत्ती पुढील प्रमाणे

नार्वेकरांवर कर्ज किती?

वैयक्तिक कर्ज – 26 लाख 38 हजार 160 रुपये कर्ज, तर पत्नीवर 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये कर्ज

बँक लोन – स्वतःवर 1 कोटी 54 लाख 81 हजार 989, पत्नीवर कर्ज 38 लाख 94 हजार 807 रुपये

नार्वेकरांकडे दागिने किती?

स्वत: नार्वेकरांकडे एकूण 71 लाख 28 हजार 189 रुपयांचे दागिने आहेत.

सोनं – 355.94 ग्राम, बाजारी भाव – 24 लाख 67 हजार 981

चांदी – 12.56 किलोग्राम, बाजारी भाव – 9 लाख 74 हजार 656

हिरे – 80.93, बाजारी भाव – 36 लाख 85 हजार 552

नार्वेकरांच्या पत्नीकडील दागिने

नार्वेकरांच्या पत्नीकडे 67 लाख 61 हजार 420 रुपयांचे दागिने आहेत.

सोनं – 425 ग्राम, 29 लाख 26 हजार 21 रुपये

चांदी – 6.26 किलो, 4 लाख 85 हजार 776

हिरे – 90.96, 33 लाख 49 हजार 623

नार्वेकरांची शेअर्समधील गुंतवणूक

श्री बालाजी कॉम. एलएलपी 50 टक्के शेयर्स तर पत्नीचे 50 टक्के शेयर्स

मिलिंद नार्वेकर यांचे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल, अंबुजा सिमेंट, अशोक लेयलँड, एसीयन पेंट्स, IDBI बँक, ICCI बँक आणि इतर कंपन्यामध्ये शेयर्स खरेदी केले.

जमीन

16 जुलै 2013 रोजी गांव मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे 74.80 एकर जमीन यामध्ये पत्नीचा 50 टक्के हिस्सा

शेतजमीन – 5 ऑगस्ट 2008 रोजी खरेदी केलेली बीड जिल्ह्यातील बाणेवाडी गावात 0.19 एकर जमीन, बेंगलोर येथे पत्नीच्या नावावर 2325 स्क्वेअर फुट जमीन

संपत्ती

मुंबईतील मालाड आणि बोरिवली येथे 1000 स्क्वेअर फुटाचे घर नावावर, पत्नीच्या नावावर अलिबाग येथे एक फार्म हाऊस नावावर आहे.

स्वतःच्या मालमत्तेची एकूण रक्कम – 4 कोटी 17 लाख 63, हजार 323, पत्नीच्या मालमत्तेची रक्कम – 11 कोटी 74 लाख 6 हजार 490 रुपये आहे.

मिलिंद नार्वेकर आणि पत्नीचे उत्पनाचे साधन

वैयक्तिक पगार, घरांचे भाडे, व्यावसायिक इन्कम

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img