3.8 C
New York

Amol Kolhe : कोल्हेंवर शरद पवारांनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

Published:

मुंबई

शरद पवार गटाचे (Sharad pawar Group) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संसदेतील (Loksabha) मुख्य प्रतोदपदी त्यांची नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत अमोल कोल्हे यांनी स्वतःहून एक्स पोस्टद्वारे माहिती दिली. शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीत एकूण 10 जागा लढवण्यात आल्या होत्या. या 10 जागांपैकी शरद पवार गटाने 8 जागा जिंकल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेनी राज्यभर दौरा करत प्रचार केला. आता शरद पवार यांच्याकडून अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलीयं. अमोल कोल्हे यांची लोकसभेत प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आलीयं, अर्थातच कोल्हे यांचा व्हिप आता राष्ट्रवादीच्या खासदारांना लागू होणार आहे. यासंदर्भातील माहिती अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिलीयं.

अमोल कोल्हे पोस्टमध्ये म्हणाले, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले, असल्याचा उल्लेख अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये केला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, तसेच ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खा. सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार मानत असल्याचं अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img